
नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थींना मोफत पाच ब्रास वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानंतर या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. वाळूअभावी प्रलंबित घरकुलांची कामे मार्गी लागणार आहेत. याबाबत आमदार राजेश पवार यांनी पाठपुरावा केला आहे.