Nanded crime news : मैत्रीला काळिमा फासणारी गोष्ट ; मित्रानेच केला मित्राचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder
मैत्रीला काळिमा फासणारी गोष्ट ; मित्रानेच केला मित्राचा खून

मैत्रीला काळिमा फासणारी गोष्ट ; मित्रानेच केला मित्राचा खून

नांदेड : पाच मित्रांनी मिळून आपल्याच एका मित्राचा खून केल्याची घटना नांदेडमध्ये उकडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खून केल्यानंतर त्या मित्राचा मृतदेह परस्पर जाळून टाकून त्याची हाडे गोदावरी पात्रात फेकून देण्यात आली. याप्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली.

एक महिन्यापासून गायब असलेल्या एका युवकाचा खून करून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावणाऱ्या पाच मित्रांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापैकी एका अल्पवयीन युवकाला ग्रामीण पोलिसांनी रविवारी (ता.२३) ताब्यात घेतले असून, त्याला बाल निरीक्षणगृहात ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिला आहे.

हेही वाचा: नांदेडमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे मंदिर बनवणारा शिवसैनिक; पाहा व्हिडिओ

अधिक माहिती अशी की, वजिराबाद पोलिस ठाण्यात २१ जानेवारी रोजी कसतुरीबाई सुलगेकर यांनी माहिती दिली. त्यानुसार त्यांचा नातू सुनील सुरेश सलगेकर (वय २१) हा कोणाला काहीही न सांगता बेपत्ता झाला होता. वजिराबाद पोलिसांनी याबाबत मिसिंगची तक्रार दाखल करून घेतली होती. दरम्यान शनिवारी (ता.२२) रोजी व्यंकटेश राजू सुलगेकर (रा. बंदाघाट रस्ता) यांनी नांदेड ग्रामीण ठाण्यात जावून दवाब दिला. त्यात म्हटले की, माझा चुलत भाऊ सुनील सुरेश सुलगेकर हा मला दिनांक १८ डिसेंबर २०२१ रोजी भेटला होता. सुनीलचे वडील सुरेश सुलगेकर यांचा २०१८ मध्ये शिवाजीनगर भागात खून झाला. त्याच्या आईचाही मृत्यू झाला आहे. सुनील मोठा झाल्यावर त्याला वाईट व्यसनाची सवय लागली. त्याचे मित्र अनिरुद्ध आचेवार, सोनू, अभिजित पुजारी, अनिल पवार हे आहेत.

हेही वाचा: चित्रकार व व्यंगचित्रकारांची बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना; पाहा व्हिडिओ

यापैकी दोघांसोबत सुनीलचे संबंध बिघडले होते. त्यातूनच त्यांचे एकमेकांशी वाद होत गेले. आणि त्यातूनच पाच जणांनी मिळून १८ डिसेंबर रोजी कौठा परिसरात सुनील सुलगेकरचा खून केला होता. तसेच त्याचा मृतदेह जाळून त्याची हाडे गोदावरी पात्रात टाकून दिले.या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक घोरबांड यांच्या सूचनेवरून पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक विजय पाटील यांच्याकडे दिला आहे.

Web Title: Friend Killed His Friend The Thing That Tarnishes Friendship In Nanded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top