पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी सात लाख रुपयांचा निधी सुपुर्द

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

नांदेडला भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांच्याकडे जमा झालेला सात लाख रुपयांचा निधी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्याकडे मंगळवारी सुपुर्द केला. 

नांदेड - देशातील कोरोना संकटावर मात करण्यासाठी आणि राष्ट्राच्या पुनर्विकासासाठी पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनानुसार नांदेड जिल्ह्यातून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून सात लाख ३८ हजार रुपयांचा धनादेश मंगळवारी (ता. २३) जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुपूर्द केला.

देशभरात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र सरकार या संकटावर मात करण्यासाठी विविध योजना, विविध उपक्रम, विविध निर्णय राबवित  आहे. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी आणि संकटकाळात अडकलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन केंद्रीय स्तरावरून, राज्य स्तरावरून वरिष्ठ नेतृत्वाने केले होते. 

हेही वाचा - धक्कादायक ! ‘ते’ दोघे अखंड प्रेमात अन्... -

नांदेड जिल्ह्यातूनही मोठी मदत
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातही पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी निधी संकलित करण्यात आला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपल्या खासदार निधीतून तब्बल एक करोड रुपये पंतप्रधान सहाय्यता निधीला यापूर्वीच दिला आहे. या शिवाय स्वतःकडून एक लाखाची मदत दिली. पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी जिल्हा भाजपाच्या वतीने एक कोटी पाच लाख रुपयांची यापूर्वीच खासदार चिखलीकर यांनी मदत पाठविली. 

सात लाख ३८ हजाराचा निधी सुपुर्द
आज पुन्हा खासदार चिखलीकर यांच्याकडे जिल्हा भाजपाच्या वतीने जमा झालेला सात लाख ३८ हजार रुपयांचा निधी जिल्हाधिकारी यांच्याकडे जमा केला. महानगराध्यक्ष प्रवीण साले यांची यावेळी उपस्थिती होती.

हेही वाचलेच पाहिजे - दुबार पेरणीसाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोफत खते, बियाणे द्यावे - खासदार चिखलीकर

यांनी केली आर्थिक मदत...
पंतप्रधान सहाय्यता निधीला पाठविण्यात आलेल्या आजच्या निधीमध्ये माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर, विजयकुमार पंढरीनाथ उत्तरवार, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी उमरी, बाबा वस्त्रालय, कचरूलाल रामदेव, सभापती आणि सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती उमरी, गुरुकृपा मेडिकलचे संचालक दत्तात्रय पवार, बालाजी देवस्थान ट्रस्ट उमरी, पंढरीनाथ मामीडवार, आशिष कदम, सभापती खरेदी विक्री संघ उमरी, प्रकाशराव निवृत्तीराव पाटील, बालाजी हनुमंत अप्पा बोधने, देगलूर येथील अशोक मसनाजीराव गंधपवाड, गिरी सेठ चिद्रावार देगलूर, शिवराज वसंतराव पाटील आणि गावकरी मंडळी माळेगाव मक्ता (तालुका देगलूर) यांच्यासह कुसुमताई चव्हाण कन्या शाळा मांजरम (तालुका नायगाव) यांच्या वतीने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी मदत करण्यात आली.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A fund of Rs. 7 lakhs has been handed over for the Prime Minister's Assistance Fund, Nanded news