
नांदेड : शहरातील माळटेकडी परिसरातील लक्ष्मीनगर येथे फर्निचर तयार करणाऱ्या एका गोडाऊनला मंगळवारी (ता. ८) सकाळी भीषण आग लागली. गोडाऊनमध्ये झोपलेल्या चार मजुरांना अग्निशमन विभागाने प्रसंगावधान राखत वाचवले. तब्बल दोन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या घटनेत सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती संबंधित मालकाने दिली आहे.