गडचिरोली पोलिस, नक्षलवादी चकमकप्रकरणी सी-४७ अलर्ट- प्रमोदकुमार शेवाळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रमोदकुमार शेवाळे

गडचिरोली पोलिस, नक्षलवादी चकमकप्रकरणी सी-४७ अलर्ट- प्रमोदकुमार शेवाळे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड ः गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्लीच्या पयडी- कोटमी जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चममक उडाली. यामध्ये १३ नक्षलवादी मारले गेले. सी-६० दलाने केलेल्या या कारवाईला हे मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे आजच गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police ) समृती दिन आहे. याच दिवशी नक्षलवादी व पोलिसांच्या चकमकीत १७ पोलिस शहीद झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे (Sp Pramodkumar Shevale) यांनी किनवट परिसरात कार्यरत असलेल्या सी- ४७ पथकाला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. (Gadchiroli- Police- C-47 alert- in- Naxal- encounter- case- PramodKumar- Shewale)

चकमकीत मारल्या गेलेल्या ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतल्याचेही सांगण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींचीही संख्या मोठी आहे. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले आहे. मृतांच्या व्यतिरिक्त काही नक्षलवादी जखमी झाले आहेत, पण त्यांचा आकडा समजू शकला नाही.

हेही वाचा - नवीन देशात, किंवा नवीन शहरांत आल्यावर तर स्वत:हून असा गोतावळा तयार करावा लागतो.

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी नक्षलविरोधी मोहिम उघडली आहे. यापूर्वी केलेल्या कारवाईतही पोलिसांना मोठे यश मिळाले होते. काही दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी एटापल्ली तालुक्यातील गट्टा पोलिस स्टेशनवर हल्ला केला होता. पण ग्रॅनाईटचा स्फोट न झाल्यामुळे तेव्हा हानी झाली नाही. तरीही पोलिस स्टेशनवर हल्ला करणे हे गंभीर आहे आणि पोलिसांनी त्याची दखल घेऊन कारवाई सुरु केली आहे.

नांदेड जिल्हा हा तेलंगना या सिमावर्ती राज्याला लागून असल्याने जिल्ह्याला नक्षलवादी चळवळीचा इतिहास आहे. किनवट, माहूर या तालुक्यात घनदाट जंगल असल्याने नक्षलवादी या परिसरात मागील काही वर्षी सक्रीय होते. त्यांचा म्होरक्या विजयकुमार नांदेड पोलिसांचा शिकार झाल्यानंतर ही चळवळ काही अंशी थंडावली. परंतु गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यात नक्षलवादी संघटना डोके वर काढतात. नांदेड जिल्ह्यात अशा घटना घडू नये म्हणून नक्षलवाद विरोधी पथक (सी. ४७) कार्यरत केले. यात हत्यारी पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. गडचिरोलीच्या घटनेवरुन या परिसरात कार्यरत पथकाला सतर्क केल्याचे पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितले.

loading image
go to top