Ganesh Festival: गणेशोत्सवानिमित्त रेल्वेचे आरक्षण फुल्ल; प्रवाशांना घ्यावा लागणार खासगी वाहनांचा आधार
Nanded Train Crisis: गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या नांदेड आणि मराठवाड्यातील चाकरमान्यांची तयारी सुरू झाली आहे. मात्र, रेल्वे आरक्षण शंभर टक्के भरल्यामुळे प्रवासाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नांदेड : अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी नांदेड आणि मराठवाड्यातील चाकरमान्यांनी गावी परतीची तयारी सुरू केली आहे. मात्र, रेल्वे आरक्षण पूर्ण झाल्यामुळे हजारो प्रवाशांना प्रवासाच्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.