Nanded :ज्येष्ठा गौरींचे आज होणार आगमन

महिला वर्गाची लगबग सुरू बाजारपेठेत मुखवटे खरेदीसाठी गर्दी
Gauri Ganpati 2022
Gauri Ganpati 2022Esakal

नांदेड : लाडक्या गणरायाच्या पाठोपाठ गौरींचेही आगमन होत असून शनिवारी (ता. तीन) घरोघरी स्थापना होणार आहे. त्यानिमित्त महिला वर्गाची लगबग सुरू आहे. तसेच शहरातील बाजारपेठही सज्ज झाली आहे. गौरीसाठी आकर्षक आरास, पंचपक्वान्न, भरजरी वस्त्रे आणि दागिने, आकर्षक रंगीबेरंगी विविध प्रकारच्या मुखवट्यांनी बाजारपेठ गजबजली आहे.

जीएसटीचा फटका सर्वच जीवनावश्यक वस्तूंना बसला असताना यातून महालक्ष्मी मुखवटेही मागे नाहीत. यंदा हे मुखवटे ३० ते ४० टक्यांनी महागले असून, दागिन्यांचेही भाव वधारले आहेत. मोत्यांच्या सुबुक दागिन्यांना महिलांची विशेष पसंती आहे. तर पूजा साहित्याचे दरही वाढलेले आहेत. महालक्ष्मी पूजनासाठी धातूचे तसेच काच आणि स्टोनवर्कचे तबक, तोरण, माळ, प्लास्टिक, फुलांचे हार, सजावट तसेच मंडपाकरिता लागणारे साहित्य यंदा शंभर ते दोनशे रुपयांनी वाढले असल्याचे आहेत.

पूजेसाठी विशेष मान

पितळी धातूपासून निर्मित पूजा साहित्याची मोठी मागणी आहे. पितळेच्या वस्तूंना पूजेसाठी विशेष मान असल्याने काही प्रमाणात विक्री वाढली आहे. बाजारात विशिष्ट आकारातील नंदादीप, पूजेची थाली, सर्म, तबक आदी वस्तू विक्रीस आल्या आहेत. यंदा मातीचे मुखवटे दीड ते अडीच हजार रुपयांपर्यंत आहेत.

काय आहे ज्येष्ठा गौरी

अखंड सौभाग्यासाठी स्त्रिया भाद्रपद महिन्यात गौरीची पूजा करतात. तीन दिवस चालणाऱ्या या पूजेत पहिल्या दिवशी गौरीचं आवाहन केलं जातं. दुसऱ्या दिवशी पूजन करुन नैवेद्य दाखवलं जातं तर तिसऱ्या दिवशी म्हणजेच विसर्जन होतं. गौरीपूजन यास महालक्ष्मी पूजन असेही म्हणतात. भाद्रपद महिन्यात शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मी, गौरीच्या प्रतिमा वा प्रतीके बसवितात. ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी मूळ नक्षत्रावर महालक्ष्मीचे विसर्जन करतात. गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात आणि तिची ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते म्हणून तिला ज्येष्ठा गौरी म्हणतात

असे आहे व्रत

गौरी ही साक्षात माता पार्वतीचे स्वरूप आहे. स्वतः पार्वती माता घरी माहेरपणाला येते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवसात माहेरवाशिणीच्या आवडीचे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरीचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर तिचे पूजन आणि मूळ नक्षत्रावर तिचे विसर्जन, असे हे तीन दिवसांचे मूळ व्रत आहे. याला ‘ज्येष्ठा गौरी पूजन’ असे म्हटले जाते.

  • पंचांगानुसार

  • पूजन तिथी

  • ज्येष्ठा गौरी आवाहन

  • तीन सप्टेंबर (शनिवार). रात्री १० वाजून ५६ मिनिटांपर्यंत

  • ज्येष्ठा गौरी पूजन

  • चार सप्टेंबर (रविवार)

  • ज्येष्ठा गौरी विसर्जन

  • सहा सप्टेंबर (सोमवार).

  • रात्री सात वाजून पाच मिनिटांपर्यंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com