
नांदेड : दुचाकीवर आलेल्या दोघांनी मारहाण करत एका युवतीचे अपहरण केल्याची घटना शहरातील रेल्वेस्थानकाच्या आवारात बुधवारी (ता. ३०) दुपारी घडली. विशेष म्हणजे, या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी एका २१ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले आहे.