esakal | कोरोना व ओला दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे, श्री रेणुका मातेला साकडे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

भगवान गडावरील दसरा मेळाव्याचा वाद पेटल्यानंतर धनंजय मुंडे हे मागील चार (२०१६) वर्षांपासून भगवान गडाऐवजी विजयादशमीला माहुर गडावर येत असतात.

कोरोना व ओला दुष्काळाचा सामना करण्याची शक्ती दे, श्री रेणुका मातेला साकडे

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार, माहूर (जि. नांदेड) : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यंदाही प्रतिवर्षाप्रमाणे विजयादशमीला माहूर गडावर हजेरी लावली. यावेळी त्यांच्या समवेत नांदेड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिनकर दहीफळे, माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष मेघराज जाधव यांची उपस्थिती होती.

भगवान गडावरील दसरा मेळाव्याचा वाद पेटल्यानंतर धनंजय मुंडे हे मागील चार (२०१६) वर्षांपासून भगवान गडाऐवजी विजयादशमीला माहुर गडावर येत असतात. यंदा कोरोनामुळे मंदिर बंद असले तरी दरवर्षीप्रमाणेच धनंजय मुंडे हे माहूर गडावर आले. त्यांनी माहूरगड पायरीचे दर्शन घेऊन शासन नियमाचे पालन करीत नवरात्र काळात मंदिर बंद असतानाही मंदिरात प्रवेश करून दर्शन घेणाऱ्या भक्तांसमोर आदर्श निर्माण केला. 

मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच माहूर 

धनंजय मुंडे हे मंत्रीपदाचा मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच माहूर येथे आले असल्याने त्यांच्या समर्थकांनी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. नामदार मुंडे हे सामान्य माणसाच्या कामाकडे विशेष लक्ष देऊन ते निकाली काढत असल्याने विश्रामगृहावर निवेदनाचा अक्षरशः पाऊस पडला. 

हेही वाचा हल्लाबोल मिरवणूक : सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल -

यांनी दिले वेगवेगळ्या मागण्यांचे निवेदन

माजी नगराध्यक्ष फिरोज दोसानी, प्रहार जनशक्ती पार्टीचे माहूर किनवट तालुकाध्यक्ष शिवचरण राठोड यांनी श्री. रेणुका देवी संस्थान येथे सुरू असलेल्या गैर कारभाराची चौकशी करून अशासकीय विश्वस्तांना निलंबित करा, पुनर्वसित लिंबायत गावाचे सरपंच रंजना सुभाष दवणे यांनी समशान भुमिसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून, किसान ब्रिगेड कडून अविनाश टनमने यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी तर जयकुमार अडकिने यांनी कोरोना काळात शारदीय नवरात्रात नियम भंग करणाऱ्या मंदिर प्रशासनातील जबाबदार लोकां विरोधात कार्यवाही करावी या मागणीसाठी तर वाई बाजार येथील रमाई घरकुल योजनेत २५ घरकुल मंजूर करून निवारा उपलब्ध करून द्यावा अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी मारोती रेकुलवार, प्रा. भगवानराव जोगदंड, बंडू राठोड, अनिल पाटील हडसणीकर, अर्जुन जाधव, भारत शेळके, रामा बोळके, अजित साबळे, शिवाजी मुंडे, मारोती बळे, सुभाष मुरकुटे, श्रीराम कांदे, गोविंद घुघे, राजेंद्र केंद्रे, ज्ञानेश्वर चाटे यांची उपस्थिती होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image