हमारी दुवा है बेटा, कोण कोणास म्हणाले...?

फोटो
फोटो

गोकुंदा (किनवट, जिल्हा नांदेड) : आदिवासी भागातील चिखली येथील पोस्ट बॅंकेचा पोस्टमन श्री. गोपणे हे डाक अधिक्षक शिवशंकर लिंगायत यांच्या मार्गदर्शनाखाली या संकटकाळी चिखली बीओ व त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या वाड्या- तांड्यात व गावात दररोज जाऊन पोस्ट बँकेची जनजागृती करीत असतात. या गावातील प्रत्येक व्यक्तीला निराधार, दिव्यांग, अंध, अपंग, गोरगरीब, शेतकरी, शेतमजूराना पोस्ट बँक व पोस्ट खात्याचे महत्व पटवून विविध योजनांची माहिती देऊन प्रचार व प्रसार या भागात मोठ्या प्रमाणात करून त्यांनी पोस्ट बँकेची सेवा घराघरात पोहचली आहे.

पोस्टमन श्री. गोपणे हे याचं गावचे रहिवासी असल्याने त्यांना चिखली येथील सर्व लोक ओळखतात.
पोस्टमन हे आपल्या गावातील निराधार, दिव्यांग, गोरगरीब, जेष्ठ नागरिक यांना शासनाने अनुदान स्टेट बँक ऑफ हैदराबाद, आयसीआय, आंध्र बँक, पंजाब बँक, एक्सेस बँक, एचडीएफसी बँक, युनियन बँक व ईतर बँकेच्या खात्यात अनुदान जमा केले आहे.

पोस्ट बँक सेवा केली जात नाही तर दिली जाते 

या बँकेत रांगेत उभे राहणे वृद्ध महिला व पुरुषांना शक्य नाही. या सर्व बँकेच्या खात्यावर जमा झालेले पैसे पोस्ट बँकेच्या Aeps प्रणालीद्वारे सर्व प्रकारच्या अनुदानाचे पैसे घरपोच पोस्टमन काढून देत आहेत.
' सेवा ' या शब्दाचे दोन आर्थ होतात पहिला म्हणजे मानवतावादी असते. दुसरी सेवा म्हणजे अर्थ व्यवस्थेची सेवा पोस्ट बँक घरोघरी जाऊन ही सेवा करीत आहे. पोस्ट बँक सेवा केली जात नाही तर दिली जाते 

खतीजा आजी पोस्टमनला बेटा मेरी तुझे दुवा है

अशीच सेवा चिखली येथील ९८ वर्षीय खतीजाबी शेख हमजा यांना चालता- उठता येत नाही बँकेत जाता येते नाही. पोस्टमन यांनी या या खतीजा आजीचा आंगठा पोस्ट बँकेच्या स्कैनरवर घेतला व आपल्या Aeps प्रणालीद्वारे निराधार योजनाचे अनुदान रुपये तीन हजार रोख रक्कम काही सेकंदात काढून दिल्याने खतीजा आजी पोस्टमनला बेटा मेरी तुझे दुवा है. बेटा मुझे दवाई लानी है पैसे नहीं थे बेटा सरकार सब दे रही है. अस म्हणून पोस्टमन गोपणे यांना आशिर्वाद दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com