
नांदेड : परंपरागत चालत आलेल्या गोदावरी महोमहोत्सवाला सोमवारी (ता.३१) सुरुवात होत आहे. दोन फेब्रुवारीपर्यंत हा महोत्सव सुरु राहणार असून, यामध्ये शहर तसेच गोदावरील प्रदुषण, उद्योग, रेल्वेचा प्रश्न आदी विषयांवर व्हर्च्युअल चर्चा होणार आहे.दरवर्षी पौष अमावस्येला गोदावरी महामहोत्सव घेण्याची परंपरा आहे. शासनाच्या नियमावलीनुसार साध्या पद्धतीने हा महामहोत्सव होणार आहे.
तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवकाळात फक्त घाट मंदीर, मठ, दर्गाह, समाधी स्थळी ५० व्यक्तींच्या उपस्थितीत पूजन, भजन, किर्तन कार्यक्रम होणार असल्याचे गोदावरी महामहोत्सव समितीतर्फे संयोजक उदयराव देशमुख, देवराव काळे, रावसाहेब महाराज, ग्रिष्म कल्याणकर, वामनराव टोके, हरी महाराज, सखाराम महाराज, आनंदा सरोदे, सचिन कळसकर यांनी कळवले आहे. महोत्सव काळात प्रामुख्याने गोदावरी प्रदुषण डिपीआर पुर्णा नदी संगम ते मांजरा तेलंगणा संगमपर्यंत वाढवणे, विष्णुपुरी-मुगट-कोटीतीर्थ येथे प्रदुषण निर्मूलन सौंदर्यीकरण योजना राबविणे, रेल्वे, रस्ते, एम्स निर्माण, आयुर्वेद हाॅस्पीटल येथे कॅन्सर उपचार, पुनर्वसन केंद्र, संविधान कलम ३७१ अंतर्गत विकास निधी, भगीरथ नगर येथे सीजीओ काॅम्पलेक्स, जिल्हास्तरावर विदेशी एनआरआय कल्याण कक्ष, उद्योग-वाणिज्य संकुल आदींबाबत आग्रह धरण्यात येणार आहे.
गोदावरी पात्रात स्नान करणे टाळावे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोदावरी महामहोत्सवादरम्यान भाविकांनी गोदावरीच्या पात्रामध्ये स्नान करणे टाळावे, असे आवाहन शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील, डॉ. प्रसाद कुलकर्णी, डॉ. गोगटे, डॉ. शिवाजीराव भोसले, डॉ. एस. बी. मोरे यांनी केले आहे.
प्रदूषण मुक्तीसाठी पुढाकार आवश्यक
गोदावरीच्या पात्रामध्ये शहरातील नाल्यांचे पाणी मिसळत असल्याने, पात्र प्रदुषीत झाले आहे. त्यामुळे गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी डीपीआर करून त्याची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. गोदावरीचा सोमेश्वर, रहाटी ते राहेरपर्यंतचा डिपीआर तयार करून जलशुद्धीकरणासाठीची उपाययोजना शास्त्रीय पद्धतीने करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, ग्राम पंचायत, नगर पालिका, महापालिका यांनी पुढाकार घ्यावा, अशी विनंती गोदावरी महामहोत्सव समितीने केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.