कापूस व्यापाऱ्यांचं चांगभलं

साजिद खान
Saturday, 7 November 2020


केंद्र शासनाच्या नवीन कायद्यामुळे खासगी कापूस खरेदी केंद्र चालकांवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण संपुष्टात आल्यानंतर वाई बाजारपेठेतील दर्जेदार कापसामध्ये तेलंगणा राज्यातील खम्मम कवडी कापूस मिसळून जादा दराने त्याची विक्री इतरत्र बाजारपेठेत केली जात आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा कापूस हा फडतल दर्जाचा संबोधून कवडीमोल भावात खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत घडत असलेल्या या गैरप्रकाराकडे चाप बसण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 
 

वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः केंद्र शासनाच्या नवीन कायद्यामुळे खासगी कापूस खरेदी केंद्र चालकांवरील कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियंत्रण संपुष्टात आल्यानंतर वाई बाजारपेठेतील दर्जेदार कापसामध्ये तेलंगणा राज्यातील खम्मम कवडी कापूस मिसळून जादा दराने त्याची विक्री इतरत्र बाजारपेठेत केली जात आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांचा कापूस हा फडतल दर्जाचा संबोधून कवडीमोल भावात खरेदी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत घडत असलेल्या या गैरप्रकाराकडे चाप बसण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. 

तेलंगणा राज्यामध्ये विक्रीला 
माहूर किनवट तालुक्यासह यवतमाळ जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील कापूस विक्रीसाठी तेलंगणा राज्यामधील आदिलाबादनंतर वाई बाजार व सारखणी या प्रमुख बाजारपेठा आहेत. निसर्ग संकटावर मात करत शेतकऱ्यांच्या हाती लागलेले कापूस तोंडावर आलेले दिवाळी उत्सव साजरा करण्यासाठी विक्री करत आहेत. शासनाचा हमीभाव पाच हजार आठशे रुपये असताना मात्र खासगी व्यापारी पाच हजार रुपये व त्याहीपेक्षा कमी दरामध्ये कापसाची खरेदी करत आहेत. दरवर्षी मराठवाड्यातला कापुस तेलंगणा राज्यामध्ये विक्रीला जात होता. 

हेही वाचा -  विधिमंडळ समित्यांमध्ये नांदेड जिल्ह्यातील या आमदारांना वगळले
विक्रेत्यांवरील अधिपत्य संपुष्टात 

इकडील कापसाला तेलंगणात मागणी देखील होती. कारण लांब धाग्याचा दर्जेदार कापूस पिकवण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील माहूर किनवट तालुक्याचा नावलौकिक आहे. परंतु यावर्षी तेलंगणा राज्यातील खम्मम म्हणून प्रसिद्ध असलेला कवडी दर्जाचा कापूस आदिलाबाद व खम्मम वरून तीन हजार ते बत्तीशे रुपये दराप्रमाणे आयात केला जात आहे. आणि स्थानिक दर्जेदार कापसामध्ये पाला करून पुढे विक्रीसाठी पाठवले जात आहे. या मुळे येथील शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या कापसाला देखील खम्ममच्या धर्तीवर मोजून तोच भाव व्यापारी देत आहेत. केंद्र शासनाचा नियमन मुक्ती कायदा शेतकऱ्यांना सुरवातीला एवढा जड जातोय की कुणाकडे तक्रारही करता येत नाही. कारण या कायद्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे खासगी कापूस विक्रेत्यांवरील अधिपत्य संपुष्टात आले आहे. शासनाचे कापूस खरेदी केंद्र सुरू झाले असते तर शेतकऱ्यांवर ही वेळ आली नसती. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good Luck To The Cotton Traders, Nanded News