esakal | Video-गुड न्यूज : २२ रुग्णांना पंजाब भवनातून निरोप
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

एकीकडे २२ कोरोना बाधीत कोरोना आजारातून मुक्त झाले असताना त्यांना घरी सोडण्याचा आनंद झाला असतानाच दुसरीकडे गुरुवारी (ता.१४ मे)  सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये पुन्हा तीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे.

Video-गुड न्यूज : २२ रुग्णांना पंजाब भवनातून निरोप

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : जगभरात ‘कोरोना’ आजाराने थैमान घातले असताना ‘जागतीक आरोग्य’ संघटनेकडून रोज नव्याने नियमावली जारी करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नवीन नियमावलीनुसार कोरोना संशयित व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास दहा दिवसांपर्यंत कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून न आल्यास त्यांना कोरोना केअर सेंटरमध्ये न ठेवता घरी सोडण्यात येत आहे.

गुरुवारी (ता.१४ मे )  नांदेड शहरातील २२ कोरोना बाधीत रुग्णाचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने व कोरोनाची लक्षणे नसल्याने त्यांना साडेचारच्या दरम्यान जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत घरी सोडण्यात आले.

एकीकडे २२ कोरोना बाधीत कोरोना आजारातून मुक्त झाले असताना त्यांना घरी सोडण्याचा आनंद झाला असतानाच दुसरीकडे गुरुवारी (ता.१४ मे) सायंकाळी पाच वाजता प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये पुन्हा तीन ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ३६ वरुन ६६ इतकी झाली आहे. यातील पाच जाणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचाच - आपके पास मै पाणीपुरी खाने को आऊंगा...

(ता. तीन मे) पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांवर विष्णुपुरी शासकीय रुग्णालय व एनआरआय यात्री निवास येथे उपचार सुरु आहेत. परंतु, मागील दहा दिवसांपासून या रुग्णांना ‘कोरोना’ आजाराची कुठलीही लक्षणे आढळून आली नाही. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांना घरी सोडण्याचा ‘सकाळी’च निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पंजाब भवन यात्रीनिवस येथे उपचार घेत असलेल्या २२ जणांस घरी सोडण्यात आले. तर डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील तीन ‘कोरोना’ बाधीत रुग्ण ‘कोरोना’ मुक्त झाल्याने त्यांना देखील घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

नांदेडकरांना मिळाला दिलासा
शहरात (ता.२२ एप्रिल) पहिला ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण पीरबुऱ्हाणनगर येथे आढळून आला होता. त्यानंतर अबचलनगरच्या ६४ वर्षीय व्यक्तीस व सेलू येथील एका महिलेस कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. आतापर्यंत २३ दिवसांत जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 66 वर पोहोचली, असून यातील पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर दोन कोरोना बाधित रुग्णांचा नेमका पत्ता मिळत नसल्याने दोघेजण अजूनही फरारच आहेत. बाधित रुग्णांपैकी अबचलनगर येथील एका रुग्णाचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्याला मंगळवारी (ता.१२ मे) रात्री उशिरा घरी सोडण्यात आले.

हेही वाचा- भटक्या-विमुक्तांच्या जीवितांचे रक्षण कोण करणार?

विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय आणि पंजाब भवन यात्री निवास येथे उपचार घेत असलेल्या २२ रुग्णांना दहा दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला व घशातील खवखव अशी कुठलीच लक्षणे दिसत नसल्याने त्यांना गुरुवारी (ता.१४ मे) कोरोना केअर सेंटरमध्ये अडकवून न ठेवता घरी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असला तरी, घरी सोडण्यात आलेल्या २२ जणांस आठवडाभरासाठी होम क्वॉरंटाईनमध्येच रहावे लागणार आहे. या काळात त्यांना कोरोना सारखी लक्षणे आढळुन आल्यास त्यांना पुन्हा रुग्णालयात बोलावण्यात येणार आहे.