Good News:देशपातळीवरील आरएसी समितीवर नांदेडचे अशोकसिंह हजारी  

प्रल्हाद कांबळे
Monday, 25 January 2021

भारत सरकारच्या आरएसी (रिजनल एडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी) वर तिन वर्षासाठी निवड केली.

नांदेड : संबंध जगाला आपल्या कवेत घेतलेल्या कोरोना या आजाराचा प्रादूर्भाव वाढू नये यासाठी अनेकांनी जोखीम पत्करत वेगवेगळ्या मार्गाने प्रशासनाला मदत केली. कोणी अन्नदान तर कोणी वैद्यीकीय सेवा दिली. मात्र सामाजीक कार्यात नेहमी अग्रेसर राहणारे नांदेडचे अशोकसिंह हजारी हेही मागे राहिले नाही. त्यांनी शासनस्तरावर कोरोना आजाराची गंभीरता लक्षात घेता या कालावधीत मुंबई येथील मंत्रालय, नांदेड शहरातील महत्वाच्या शासकिय  कार्यालयात सॅनिटायझर केले. त्यांच्या या विधायक कामाची दखल भारत सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाने राज्यशासनाच्या प्रस्तावावरुन घेतली. एवढेच नाही तर त्यांची भारत सरकारच्या आरएसी (रिजनल एडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी) वर तिन वर्षासाठी निवड केली. नुकतेचत्यांच्या निवडीचे पत्र कामगार मंत्रालयाचे सचीव राजेंद्र कातोरे यांनी दिले. 

कोरोना काळात माणूसकीचे विचित्र दर्शन पहावयास मिळत होते. आपले म्हणणारेच जवळ येत नव्हते. त्यात कोरोनामुळे जर मृत्यू आला तर त्याचे अंतिमसंस्काराकडे पाठ फिरवत होते. माणूस माणसापासून दुरावला होता. मात्र अशोकसिंह हजारी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या बळावर स्वत: जीव धोक्यात घालून सतत त्यांनी चार महिणे अतीपरिश्रम घेतले. नांदेड शहरातील पोलिस अधीक्षक कार्यालयासह विविध शासकिय कार्यालय सॅनिटायझर केले. ते एवएवढ्यावरच न थांबता त्यांनी थेट मुंबई गाठली. तेथे जावून मंत्रालय सॅनिटायझर केले. या कामाची दखल राज्य सरकारने घेतली. 

महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिफारस

त्यानंतर त्यांची शिफारस दिल्ली येथील श्रम व रोजगार मंत्रालयाकडे केली. शासनस्तरावर योग्य ती मदत केल्याबद्दल अशोकसिंह हजारी यांची दिल्ली येथील केंद्र शासनाच्या श्रम व रोजगार मंत्रालय (मिनिस्ट्री ऑफ लेबर अॅंड एम्पलोयी) कडे केली. त्यावरुन आरएसी (रिजनल एडमिनिस्ट्रेटिव्ह कमिटी) भारत सरकारच्या महत्वाच्या समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली. सदर नियुक्तीचे पत्र भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ लेबर एम्पलोयीचे अंडर सेक्रेटरी अतुलकुमार सिंह यांनी राज्य शासनाकडे पाठविली. दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या वतीने ही शिफारस करण्यात आली होती. श्री. हजारी यांच्या नियुक्तीबद्दल कामगार मंत्रालयाचे सचिव राजेंद्र कातोरे यांनी नियुक्तीपत्र देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माझ्या कष्टाचे चीज झाल्याची भावना अशोकसिंह हजारी यांनी बोलून दाखविली.

यांनी केले अभिनंदन

आरएसी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल अशोकसिंह हजारे यांचे सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी राम गगराणी, डॉ. दीपकसिंह हजारी, बालाजी चव्हाण, गौतम नागडा, लक्ष्मीनारायण मानधनी, डॉ. धोंडीराज जाधव, डॉ. सुरज, डॉ. नितीन, जयदीप गणेश, शिवम हजारी, संजय हजारी, जितेंद्र हजारी, डाॅ. रुपेश हजारी, पंकज परिहार, शैलेशसिंह हजारी, विजयसिंह हजारी आणि राहूलसिंह हजारी यांच्यासह आदी व्यापाऱ्यांनी अभिनंदन केले.

समितीचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय सचीव

या समितीचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय सचीवसतात. समितीत दोन केंद्रीय मंत्री (ज्यात एक कॅबिनेट तर दुसरे राज्यमंत्री), दोन कामगार आयुक्त आणि एक सामाजीक कार्यकर्ता अशा सहा जणांची सदस्यपदी नियुक्ती असते. ही समिती संबंध देशभर श्रम व रोजगार मंत्रालयांतर्गत येणाऱ्या सर्व क्षेत्रात काम करत असून देशातील या महत्वाच्या समितीवर नांदेडच्या अशोकसिंह हजारी यांच्या कामाची दखल घेण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News: Ashok Singh Hazari of Nanded on the national level RAC committee nanded news