esakal | Good News : पीक नुकसानीची रक्कम एकत्रच मिळणार- डॉ.विपीन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कोरोना, अतिवृष्टी आणि पशुधनावर आलेले लम्पी स्किन आजार या तिहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची रक्कम आता पिक विमा कंपन्यांनी एक्त्रच द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी संबंधीत विमा कंपन्यांना दिले आहेत.

Good News : पीक नुकसानीची रक्कम एकत्रच मिळणार- डॉ.विपीन

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यातील शेतकरी मागील काही वर्षापासून सतत संकटाच्या चक्रामध्ये अडकला आहे. यावर्षी तर तिहेरी संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीचाही फटका बसत आहे. कोरोना, अतिवृष्टी आणि पशुधनावर आलेले लम्पी स्किन आजार या तिहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची रक्कम आता पिक विमा कंपन्यांनी एक्त्रच द्यावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी संबंधीत विमा कंपन्यांना दिले आहेत. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी चांगला असल्याचे बोलल्या जात आहे. 

जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यासह इतर कारणामुळे झालेल्या पीक नुकसानीपोटीची २५ टक्के रक्कम ॲडव्हान्स देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र ही तुटपुंजी रक्कम पाहता नुकसानीपोटीचे एकत्रित रक्कम देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी पिक विमा कंपन्यांना दिले आहेत. पिक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढतच आहे. परंतु त्याच वेळी पीक विमा कंपन्यांच्या कामकाजाबाबतच्या तक्रारी कमी झाल्या नाही.

हेही वाचा नांदेड : केळी पीक विमाप्रकरणी जिल्हा समितीकडून पाहणी, धक्कादायक त्रुट्या उघडकीस

तक्रारींची संख्या नुकसानीच्या प्रमाणात अत्यल्पच 

खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुरामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आता मदतीची अपेक्षा आहे. त्याचवेळी पिक विमा कंपन्यांना नुकसानीपोटी २५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना आता करावी असे शासन आदेश आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीच्या तक्रारी विमा कंपन्यांकडे करण्याबाबत कृषी विभागासह जिल्हा प्रशासनाने आव्हान केले होते. तक्रारींची संख्या नुकसानीच्या प्रमाणात अत्यल्पच आहे.
 
सविस्तर मार्गदर्शन घ्यावे

तक्रार करण्यासाठी नेमके काय करायचे, विमा कंपनीचे कार्यालय कुठे आहे, कृषी विभागाकडे तक्रारी करायच्या का असे अनेक प्रश्‍न शेतकर्‍यांपुढे उभे होते, दुसरीकडे नुकसान भरपाईपोटी मिळणारे २५ टक्के ॲडव्हान्स रक्कम ही अतिशय तुटपुंजे असल्याने नुकसानीची एकत्रित रक्कम शेतकऱ्यांच्या उपयोगी पडणार ही बाब लक्षात आल्याने विमा कंपन्यांकडून एकत्रित रक्कम शेतकऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

येथे क्लिक करा - सहस्त्रकुंड धबधबा मृत्यूचा हॉटस्पॉट : यवतमाळची पर्यटक महिला गेली वाहून

पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात

जिल्ह्यात अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे महसूल कृषी विभागासह पिक विमा कंपनीकडून केले जात आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित कालावधीतील पंचनामे सुरू आहेत. ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात एक हजार ३५१ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान अतिवृष्टीने झाले असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक रविशंकर चलवदे यांनी दिली.

loading image
go to top