Good News : नांदेड जिल्ह्यात कोरोना काळात ८७ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकरी उत्पादक कंपनी

Good News : नांदेड जिल्ह्यात कोरोना काळात ८७ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड ः कोरोना आपत्तीच्या काळात अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. परंतु, शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer product compony) तग धरुन आहेत. राज्यात सध्या चार हजार ६३० शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. त्यात नांदेड जिल्ह्यात २३७ कंपन्यांचा (Nanded) सहभाग आहे. त्यातील अनेक नवीन कंपन्यांनी नोंदणी ही मार्च २०२० नंतर म्हणजे लॉकडाउनच्या काळात (Lockdown) झाली असून, जिल्ह्यात मार्च २०२० ते ता. २० मे २०२१ पर्यंत ८७ कंपन्या स्थापन झाल्या आहेत. (Good- News-Establishment- of 87 farmer- manufacturing- companies- in- Nanded- district- during Corona- period)

सद्यस्थितीत कोरोना काळात सर्वांच उद्योग धंद्यांची घडी विस्कटलेली आहे. परंतु, राज्यभर कार्यरत असलेल्या हजारो शेतकरी उत्पादक कंपन्यांनी न डगमगता आपले कामकाज सुरळीत ठेवले आहे. खरेदी, बाजारभाव, अनुदान याबाबतची काही शासकीय धोरणे, अटी शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी अनुकूल नाही तरीही कंपन्यांनी त्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून आपले कार्य सुरु ठेवलेले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम आज समोर येत आहेत.

हेही वाचा - "अग्गंबाई सुनबाई'' मालिकेतील दृश्याचा शिंपी समाजातर्फे निषेध; जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलनाचा इशारा

मार्च २०२० पासून आतापर्यंत राज्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये मार्च २०२० ते ता. २० मे २०२१ पर्यंत ८७ कंपन्या नव्या स्थापन झालेल्या आहेत. त्यामुळे सहकारी क्षेत्रापुढे शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एक मोठे आव्हान उभे केले आहे. राज्यात दहा हजार कंपन्या स्थापन करण्याचे शासनाचे उद्दीष्ट आहे.

शेतकऱ्यांना होतोय फायदा

नांदेड शहरात अनेक सेंद्रीय भाजीपाला उत्पादक शेतकरी गट चांगल्या पद्धतीने थेट भाजीपाल्याची विक्री करत आहे. तसेच नाफेड अंतर्गत महाएफपीसीकडून जिल्ह्यातील काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शासनाच्या किमान हमी दरानुसार तूर, हरभरा खरेदी केली आहे. त्या-त्या भागामध्ये ही केंद्रे सुरु झाली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वाहतुकीच्या खर्चात बचत झाली.

दृष्टिक्षेपात लातूर विभाग

- लातूर - ३१५

- उस्मानाबाद - १७१

- नांदेड - २३७

- परभणी - ६९

- हिंगोली - ८६

शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून अनेक शेतकरी आपले उत्पादन वाढत आहेत. शेतकरी उत्पादक कंपनी ही संकल्पना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. शेतकरी आणि शेती व्यवसायानेही आता काळाची पावले ओळखून तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्याचे आशादायी चित्र बघायला मिळत आहे.

- रवीशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, नांदेड.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top