"अग्गंबाई सुनबाई" मध्ये कलाकाराने मारली शिलाई मशीनला लाथ! शिंपी समाजाच्या भावना दुखावल्याने निषेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

marathi serial

"अग्गंबाई सुनबाई" मधील दृश्यावर शिंपी समाजाचा आक्षेप

डीजीपी नगर (नाशिक) : झी टिव्ही वाहिनीवरील "अग्गंबाई सुनबाई" या मालिकेतील (marathi serial) एका प्रोमोमध्ये कलाकार (artist) शिलाई मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवण्यात आल्याने टेलर व शिंपी काम करणाऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्याने मालिकेच्या लेखक दिग्दर्शकाचा समस्त शिंपी समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. (Protest against hurting feelings of tailor community)

शिवण मशीनला लाथ मारल्याचे दृश्य

गुरुवारी (ता.२०) मे रोजी रात्री ८-३० वाजता झी टिव्हीवर प्रसारित होणारी 'अग्गंबाई सुनबाई' या मालिकेतील नियमितपणे हाेत असलेल्या एपिसोडमध्ये मालिकेत महत्वाची व्यक्तीरेखा साकारत असलेले अभिनेते अद्वैत दादरकर यांनी समस्त शिंपी समाजाचे उपजीवीकेचे साधन असलेल्या व पुजनीय असलेल्या शिवण मशीनला लाथ मारल्याचे दृश्य दाखवून टेलर शिंपी समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नामदेव महाराजांचा घोर अपमान केला आहे. याचा समाज बांधवांनी जाहीर निषेध केला आहे.

शिंपी समाजातर्फे जाहीर निषेध

या मालिकेचे लेखक,दिग्दर्शक व झी टीव्ही यांचा अखिल भारतीय श्री क्षत्रीय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेतर्फे जाहीर निषेध केला आहे. तसेच दिग्दर्शक व झी टीव्हीने समस्त शिंपी समाजाची दुरदर्शनच्या माध्यमातूनच जाहीर माफी मागावी अन्यथा आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी मालिकेचे लेखक, दिग्दर्शक व झी. टीव्हीची राहील असा इशारा शिंपी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र बागुल, संजय खैरनार, आर.टी.सोनवणे व मध्यवर्ती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

हेही वाचा: निष्ठावंतांना डावलून पूर्वाश्रमीचे भाजपवासिय समितीत कसे?

चित्रीत केलेला प्रसंग त्वरीत वगळण्यात यावा अन्यथा समस्त शिंपी समाजाकडून जाहीर आंदोलन छेडले जाईल- रवींद्र बागूल, राष्ट्रीय अध्यक्ष

हेही वाचा: रेमडेसिव्हिर पुरविणाऱ्या एका समूहाचा वापर थांबविला

loading image
go to top