शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज : पोस्ट बँक शेतकऱ्यांच्या बांधावर

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 12 August 2020

शेताच्या बांधावर पोस्ट बँकेने जाऊन दहा हजार रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक खात्यातून AEPS द्वारे पोस्ट मास्तर रवी वाडीकर यांनी काढून दिले.

नांदेड : किनवट तालुक्यातील सहस्रकुंड (धबधबा) गावातील शेतकरी जगाचा पोशिंदा संदीप तुमलवाड यांच्या शेताच्या बांधावर पोस्ट बँकेने जाऊन दहा हजार रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया या बँक खात्यातून AEPS द्वारे पोस्ट मास्तर रवी वाडीकर यांनी काढून दिले.

जगाचा पोशिंद्याबदल कवी किरण निकम यांच्या कवितांचा ओळी या ठिकाणी आठवल्या.
कष्टटाळू  बाप माझा...राबतो राबी..
दिवसभर काबाड कष्ट आहे... यांच्या नशिबी..
घामाच्या थेंबातून..... पिकवले मोती...
काळ्या भूमीशी..…जीवनाची नाती...
दुष्काळ थयमान घालून... नाचत थय थय...
दुपारचे उन्ह...अंगाच्या लाह्यां लाह्यां..

फवारणीसाठी काही मिनीटातच दहा हजार हातावर

पुन्हा दसरे शेतकरी संदीप यांना शेतात गेल्यावर त्यांनी पिकाची पहाणी केली. त्यावेळेस त्याच्या लक्षात आले की शेतातील पिकावर आळी पडली आहे. पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी पिकावर रासायनिक औषधी फवारणी करणे आवश्यक आहे. पण घरी पैसे नाहीत औषधी दुकानातून घेऊन येण्यासाठी जगाचा पोशिंदा संदीप यांनी शेता मधून पोस्ट बँकेचे ब्रँच पोस्ट मास्तर रवी वाडीकर यांना फोन केला व दहा हजार रुपयांची मागणी केली.

हेही वाचा -  अभियांत्रिकी पदविकासाठी प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु

ब्रँच पोस्ट मास्तर रवी वाडीकर यांचे परिश्रम

ब्रँच पोस्ट मास्तर रवी वाडीकर हे दिलेल्या पत्यावर वेळ न करता मोदुचाकीने शेताच्या बांधावर गेले व बळीराजा संदीप यांच्या आधार कार्ड नंबर घेतला आणि पोस्ट बँकेच्या मोबाईल Aeps सुविधा ला जोडला आणि हाताचा आंगठा बायोमेट्रिक ठेवला एक संदेश बळीराजा संदीप यांच्या मोबाईलवर आला.
तो नंबर नंतर पोस्ट बँकेच्या Aeps जोडला आणि एका मिनिटात स्टेट बँक ऑफ इंडिया बँक खात्यातील रोख  रुपये दहा हजार रुपये शेताच्या बांधावर संदीप यांना काढून दिले.

देशातील पहिली पोस्ट बँक 

आजवर शेतकरी दोनशे रुपये बँकेतून काढण्यासाठी घरुन भाकरी घेऊन बँकेच्या रांगेत ऊभे राहावे लागत असे. सर्वजण बँकेचे पैसे काढण्यासाठी बँकेत जातात पण देशातील पहिली पोस्ट बँक आहे की ती प्रत्येक नागरिकाच्या घरोघरी व शेताच्या बांधावर जाऊन बँक सेवा देते. यामुळे जगाचा पोशिंदा यांच्या वाटेला पोस्ट बँकेमुळे सुखच सुख बघायला मिळत आहे. पोस्ट बँकेमुळे जय जवान जय किसान यांचे स्वप्न साकार होत असल्याची चर्चा शेतकरी वर्गात होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for farmers: Post Bank on farmers' farm nanded news