प्रवाशांसाठी गुड न्यूज : रेल्वेमध्ये 139 या एकच हेल्पलाईन नंबरवर सर्व सेवासुविधा 

प्रल्हाद कांबळे
Friday, 19 February 2021

आत्तापर्यंत रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान चोरी, धोका, खिसे कापूपासून सुरक्षा तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मदत हवी असल्यास 182 या नंबरवर सेवा मिळत होती.

नांदेड : भारतीय रेल्वे मध्ये पूर्वी 182 हा प्रवाशांना सुरक्षेसंबंधीचा हेल्पलाईन नंबर होता. प्रवाशांच्या सुविधेकरिता या पुढे हा नंबर 139 या हेल्पलाईन नंबरसोबत जोडण्यात आला आहे. 

आत्तापर्यंत रेल्वे प्रवाशांना प्रवासादरम्यान चोरी, धोका, खिसे कापूपासून सुरक्षा तसेच इतर गुन्हेगारी प्रवृत्तीपासून मदत हवी असल्यास 182 या नंबरवर सेवा मिळत होती. यापुढे प्रवाशांना प्रवासादरम्यान मदतीकरिता तसेच स्वच्छतेकरिता किंवा आणखी कुठलीही माहिती हवी असल्यास त्यांना फक्त 139 या एकाचा नंबरवर सर्व सेवा उपलब्ध होईल. तसेच भारतीय रेल्वेवर यापुढे ‘रेल मदत’ (RAIL MADAT) या मोबाईल एपची सेवा मिळेल. या मोबाईल एपवर रेल्वे प्रवाशांना आपली तक्रार नोंदविता येईल. तसेच रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रवासाविषयी इतरही माहिती या मोबाईल एपवर प्राप्त करता येईल. 

हेही वाचा नांदेडात अवकाळीचा बळी : सुजलेगाव येथे विज पडून मजूराचा मृत्यू

‘रेल मदत’ (RAIL MADAT) ची वैशिष्टे  

1. तक्रार नोंदविण्याची, सहायता मागण्याचे विविध पर्याय उपलब्ध. 
2. कमीत कमी माहितीच्या आधारे तक्रार नोंदविण्याता येते. 
3. तक्रार नोंदविल्यास लगेच एक विशिष्ठ आईडी मिळतो, ज्यावर प्रवाशाला तक्रारची पुढील कार्यवाही केल्याची माहिती मिळविता येते. 
4. तक्रारीवर घेतलेल्या एक्शनचीही माहिती एस.एम.एस. द्वारे पाठविण्यात येते. 
5. हे एप गुगल प्ले स्टोर तसेच आई स्टोर वरुन डाऊनलोड करता येते. 
6. या संकेत स्थळावर जावूनसुद्धा आपली तक्रार नोंदिविता येते. 
7. ‘रेल मदत’ (RAIL MADAT) एपवर प्रवाशांना सुरक्षा, चाईल्ड हेल्प लाईन, केटरिंग, कोच स्वच्छता, अपघात, भ्रष्टाचार, इत्यादीची तक्रार नोंदविता येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for passengers: All services on the single helpline number 139 in the railways nanded news