करदात्या व्यापाऱ्यांसाठी खुशखबर

साजिद खान
Saturday, 5 December 2020

कोरोना काळात करदात्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. व्यापार, व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापारी वर्ग आर्थिक डबघाईला आल्याची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर करदात्या व्यापाऱ्यांचे विक्रीकर थकबाकी वरील व्याज व दंड माफ करून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची आग्रही मागणी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना एका पत्राद्वारे केली आहे. 
 

वाई बाजार, (ता.माहूर, जि. नांदेड) ः कोरोना काळात करदात्या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. व्यापार, व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापारी वर्ग आर्थिक डबघाईला आल्याची परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर करदात्या व्यापाऱ्यांचे विक्रीकर थकबाकी वरील व्याज व दंड माफ करून व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची आग्रही मागणी आमदार भीमराव केराम यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांना एका पत्राद्वारे केली आहे. आमदार केराम करत असलेल्या पाठपुराव्यामुळे व्यापारी यांच्या आशा पल्लवित झाल्या असून या दिलासादायक बातमीमुळे व्यापारी समुहात आनंदाचे वातावरण आहे.

 

व्यापाऱ्यांना मोठा दिलासा 
कोरोना व लॉकडाउनमुळे राज्यातील व्यापार, व्यवहार ठप्प झाले आहेत. कोरोनामुळे कारखानदार, व्यापारी करदात्यांना आपले व्यवसाय उद्योग व कारखाने चालविणे अडचणीचे झाले आहे. व्यापाऱ्यांची उलाढाल थांबल्यामुळे राज्य सरकारलाही महसुल मिळेनासे झाले आहे. मुंबई विक्रीकर कायदा व मुल्यवर्धीत कर कायद्याखाली करदात्यांकडे कोट्यावधी रुपयाची थकबाकी आहे. त्या थकबाकीवरील व्याज व दंड माफ करून अभय योजना सरकारने जाहीर केल्यास राज्यातील करदाते मुद्दत थकबाकी मोठ्या प्रमाणात भरतील. त्यामुळे एका बाजूने राज्य शासनाला महसूल प्राप्त होईल व दुसऱ्या बाजूने थकबाकी वरील व्याज व दंड माफ केल्याने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.

हेही वाचा -  परभणी : लोअर दुधनाच्या पाण्यामुळे परिसर झाला हिरवागार.
 

कारखानदार वर्गास दिलासा योजना जाहीर करावी 
कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापारी, कारखानदार वर्गास दिलासा देण्यासाठी अभय योजना जाहीर करावी अशी मागणी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी, कर सल्लागार संघटना नांदेड यांच्या प्रतिनिधी मंडळाचे निवेदन आमदार भीमराव केराम यांना प्राप्त झाले असून या निवेदनात शासनाला व्यापाऱ्यांकडील थकबाकी वसुली होईल व व्याज आणि दंड माफ झाल्यास अडचणीत सापडलेल्या व्यापाऱ्यांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्तविली आहे. किनवट विधान सभा मतदार संघाचे आमदार भीमराव केराम यांनी व्यापारी, कारखानदार करदात्यांना थकबाकी वरील व्याज आणि दंड माफी जाहीर करून अभय योजना जाहीर करण्याची आग्रही मागणी करता (ता.चार) डिसेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्य मंत्री अजित पवार सह महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

संपादन - स्वप्निल गायकवाड
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good news for taxpayers, Nanded News