चांगली बातमी : उन्नती महिला बचत गटाची भरारी, छोट्या व्यवसायातून केली जातेय लाखोची उलाढाल

file photo
file photo

उमरी (जिल्हा नांदेड) ः तालुक्यातील गोरठा येथील ग्रामीण भागातील महिला आपण काही तरी केले पाहिजे, अशी मनाशी खूनगाठ ठेऊन स्वर्णमाला सुभाष अंनतवार, वनिता श्याम अरटवार, अनुसयाबाई अंनतवार, जनाबाई तिलमवार, भाग्यश्री मारकवार, जयश्री मारकवार आदींनी घरातील पिठाच्या व दाळीच्या डब्यात पैसे लपऊन ठेवलेले सात महिलांनी एकत्र बसुन उन्नती महिला बचत गट तयार केला.


यातुन आपण एक उद्योग उभारले पाहिजे, गोळा केलेला पैसे व व्यंकटराव पाटिल कवळे पतसंस्थेच्या माध्यमातून साडे तिन लाख रुपये घेऊन व्यवसाय उभा केला. तेंव्हा या बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी बोटव्या, पापड, आलू चिप्स, हळद, दाळ तयार करण्याचे मशीन, पिठची गिरणी आदी मशनरी हैद्राबाद येथून खरेदी करून घेऊन उद्योग सुरू केला.


शेवया, चिप्स, पापड, हळद पुड पॅकींग करुन निझामाबाद, हैदराबाद, उमरी, नांदेड, भोकर, नायगाव, मुदखेड आदी बाजारात तयार केलेला माला विकू लागले. व्यंकटराव पाटील कवळे पतसंस्थेकडुन घेतलेले कर्जे परतफेड झाले. पुन्हा अजुन काही वेगळा उद्योग उभारला पाहिजे म्हणून सात महिलांनी उमरीच्या भारतीय स्टेट बॅँकेच्या माध्यमातून एक लाख नव्वद हजारांचे कर्ज घेऊन यात पिठाची मोठी गिरणी आणली. गिरणी चांगली चालल्याने बॅँकेचे कर्जेही फेडले. आम्ही जेंव्हा कर्जे द्या म्हणून बॅँकेत जावे लागले, तेच आता बॅँक वाले कर्ज लागते का? असे म्हणुन घरी येत आहेत.
बचत गटाच्या माध्यमातून बँकेत आम्ही उद्योगातुन पैसा जमा करत आहेत. असे अध्यक्ष स्वर्णमाला सुभाष अंनतवार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. या वेळी उन्नती महिला बचत गटाच्या अध्यक्ष स्वर्णमाला सुभाष अंनतवार, उपाध्यक्ष वनिताबाई श्याम अरटवार, कोषाध्यक्ष अनुसयाबाई गंगाधर अंनतवार, सचीव जनाबाई गंगाधर तिलमवार, भाग्यश्री श्याम मारकवार, जयश्री श्याम मारकवार, आदी सर्व गोरठा येथील आहेत. आता अजून दुसरा व्यवसाय म्हणून मिरची पावडर बाजारात उपलब्ध करून विकू लागले.

आता दिवाळीचा सण असल्याने शेवयांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे या उन्नती महिला बचत गटांनी शेवया करुन विकण्याचा व्यवसाय सुरू केला. उन्नती महिला बचत गटाच्या महिलांनी ‘सकाळ’कडे माहिती देताना म्हणाले. महिलांनी खचुन जाऊ नये, एका विचारांच्या, एका मनाच्या, एका जीवाच्या महिला एकत्र येऊन आमच्या सारखे गट तयार करा बॅँकेतुन कर्जे घ्यावे. त्या घेतलेल्या कर्जाची परतफेड ताबडतोब करा. बॅँकेत पत निर्माण करा, बॅँक आपणाला घरी येऊन कर्ज देऊ शकते. त्यातुन अनेक उद्योग उभे करावे त्यातुन आलेला दोन पैसा आपल्या घर संसारासाठी लावा. तो आनंद वेगळा वाटेल. सन्मानाने जीवन जगायला मिळेल. हा आमचा अनुभव आहे. संसार आनंदात चालेल.
- स्वर्णमाला अंनतवार, बचत गट अध्यक्ष.

संपादन - स्वप्नील गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com