शासनाने मंदिरे उघडण्यास आता परवानगी द्यावी : दत्तू डहाळे

प्रमोद चौधरी
Friday, 16 October 2020

कोरोना महामारीतून हळूहळू आता सर्वच व्यवहार सुरु झाले आहे. रेल्वे, बसेसही सुरु झालेत. परंतु, मंदिरे अद्यापही उघडण्यास परवानगी मिळाली नसल्याने भाविकांसह पुजाऱ्यांमधूनही नाराजी व्यक्त होत असल्याचे पाचलेगावर महाराजांचे ज्येष्ठ अनुयायी दत्तू डहाळे यांनी सांगितले.

नांदेड : गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण जग कोरोनाच्या महामारीमुळे त्रस्त झालेले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव होवू नये यासाठी देश लाॅकडाऊन झाला. सर्वप्रकारची दुकाने, मंदिरे, रेल्वे, बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र, हळूहळू सर्वच व्यवहार सुरु झाले आहे. परंतु, मंदिरे अद्यापही उघडण्यास परवानगी मिळाली नसल्याने भाविकांसह पुजाऱ्यांमधूनही नाराजी व्यक्त होत असल्याचे पाचलेगावर महाराजांचे ज्येष्ठ अनुयायी दत्तू डहाळे यांनी सांगितले.

कोरोना विषाणूमुळे लहानांपासून ते ज्येष्ठ नागरिक भयभीत झालेले आहेत. रुग्णालयाची बिले ऐकताच अर्धे तेथेच खचून जात आहे. डाॅक्टर्स आपल्या सेवेत स्वतःला झोकून देतात; पण अद्यापही शोध अपुराच आहे. माणसं गेल्यावर त्यांचे दर्शनसुद्धा नातेवाईकांच्या नशिबात नाही, अशी अवघड परिस्थिती कोरोनाने निर्माण केलेली आहे.

हेही वाचा - नांदेडकरांना दिलासा : कोरोना बाधितांच्या संख्येत आणि मृत्यूदरात घट

मनशुद्धीसाठी मंदिरच आहे एकमेव जागा
कोरोनाच्या या महामारीतून देश हळूहळू सावरताना दिसत असलातरी, प्रभाव कमी झालेला नाही. त्यामुळे स्वतःसोबतच कुटुंबाची काळजी घेवून सतर्क राहणे, एवढेच आता आपल्या हातात आहे. त्यामुळे केंद्राने संपूर्ण व्यवहार सुरु करण्याचे आदेश राज्यांना दिलेले आहे. त्यानुसार सर्वप्रकारचे व्यवसाय सुरुदेखील झाले आहे. परंतु, मंदिरे उघडण्यासाठी महाराष्ट्र शासनाने अद्यापही परवानगी दिलेली नसल्याने, पुजारी आर्थिक अडचणीत सापडलेले आहे. शिवाय नागरिकांनाही मनशुद्धीसाठी दुसरी जागा नसल्याने तेही नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचलेच पाहिजे - ‘रेमडेसिव्हीर’चा साठा करायचा कुणाच्या भरवशावर,  रुग्णसंख्या घटली, दोन मेडिकलवर आजपासून स्वःस्तात ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन

मंदिरे उघडल्यास विध्वंसकता थांबेल
आज दारुमुळे अनेकांची कुटुंबिय उद्ध्वस्त झालेली आहे. ग्रामीण भगात याचे प्रमाण सर्वाधिक आहे. सद्यस्थितीत अनेकांच्या हाताला काम नाही. एकवेळ जेवण्याचीही भ्रांत त्यांना सतावत आहे. अनेकांना निवारा नाही. तरुण बेकारीमुळे गुन्हेगारीकडे वळत आहे.  महिलादेखील आज सुरक्षीत नाहीत. भररस्त्यावर महिलांचे दागीणे, मोबाईल, पर्स चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. परिणामी विध्वंसकता वाढीस लागली आहे. 

पुजाऱ्यांची उपासमार थांबेल
मंदिराची जागा ही पवित्र आणि शुद्ध प्रेरणा देणारी असते. मंदिरात आल्यावर भाविकांचे मनोधैर्य वाढते. त्यामुळे मंदिरे शासनाने उघडण्यास परवानगी द्यावी. कारण, मंदिरे हीच पुजाऱ्यांचे उपजिविकेचे साधन आहे. 
- दत्तू डहाळे, पाचलेगावकर महाराज यांचे ज्येष्ठ अनुयायी (नांदेड)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Government Should Now Allow The Opening Temples Nanded News