‘रेमडेसिव्हीर’चा साठा करायचा कुणाच्या भरवशावर, रुग्णसंख्या घटली, दोन मेडिकलवर आजपासून स्वःस्तात ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन

शिवचरण वावळे
Thursday, 15 October 2020

‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीकडून औषधी दुकानदारास दोन हजार २८० रुपयाला एक इंजेक्शन या दराने पुरवठा केला जाणार आहे. त्याशिवाय इंजेक्शनवर अतिरिक्त १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे मेडिकल विक्रेत्यांना ग्राहकांना केवळ दोन हजार ३६० रुपयाला इंजेक्शन विक्री करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत.

नांदेड - मागील तीन महिण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ होत होती. या दरम्यान अनेक रुग्णांना ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन वेळेवर उपलब्ध होत नव्हते. त्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागत होते. दरम्यान, वेळेवर इंजेक्शन उपलब्ध न झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला. यापुढे रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा भासणार नाही. शुक्रवार (ता.१६) पासून शहरातील दोन औषधी दुकानात ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.

‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शन तयार करणाऱ्या कंपनीकडून औषधी दुकानदारास दोन हजार २८० रुपयाला एक इंजेक्शन या दराने पुरवठा केला जाणार आहे. त्याशिवाय इंजेक्शनवर अतिरिक्त १२ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. त्यामुळे मेडिकल विक्रेत्यांना ग्राहकांना केवळ दोन हजार ३६० रुपयाला इंजेक्शन विक्री करण्याच्या शासनाने सूचना दिल्या आहेत. स्वस्तात इंजेक्शन मिळणे हे सामान्य ग्राहकांच्या हिताचे आहे. परंतू, कंपनीकडून आलेले ‘रेमडेसिव्हीर’ इंजेक्शनची एक्सपायरी डेट दोन महिणे इतकी आहे. यामुळे औषधी विक्रेत्यांनी मागवलेले सर्व रेमडेसिव्हीर इंजेक्शन दोन महिण्याच्या आत विक्री करावी लागणार आहे. मागवलेल्या इंजेक्शन मधले एकजरी इंजेक्शन शिल्लक राहिल्यास त्यांना दोन हजार रुपयापेक्षा अधिकचे अर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. 

हेही वाचा- नांदेड : अपहरण झालेल्या मुलाची सुटका, तामसा पोलिसांची कारवाई ​

गुरुवारी दोन्ही औषध विक्रेत्यांना प्रत्येकी सहा रेमडेसिव्हीर
 
ठोक विक्रेत्याकडून एकदाच विकत घेतलेले इंजेक्शन परत होणार नसल्याने किंवा कंपनीदेखील इंजेक्शन परत घेणार नसल्यामुळे रेमडेसिव्हीर इंजेक्शनाचा साठा करावा, तरी कसा अशा संभ्रामावस्थेत दोन्ही औषध विक्रेते सापडले आहेत. सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने रेमडेसिव्हिर इंजेक्शनास जास्त मागणी होत नाही. त्यामुळे दिवसाला नेमके किती इंजेक्शनची गरज भासणार याचा अजून कुणालाही अंदाज  आलेला नाही. त्यामुळे शहरातील दोन्ही औषध विक्रेत्यांनी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली व समस्यांचा पाढा वाचल्यानंतर औषध विक्रेत्यांनी आवश्‍यक तेवढ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन मागणी करावी ते जिल्हा शल्यचिकित्सकांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करु नये अशा सूचना विक्रेत्यांना दिल्या आहेत. गुरुवारी शहरातील दोन्ही औषध विक्रेत्यांना प्रत्येकी सहा रेमडेसिव्हीर इंजेक्शनचे वाटप केले आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : पकडलेल्या त्या धान्याच्या ट्रकवर प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच कारवाई ​

शासकीय रुग्णालयात इंजेक्शन साठ्यांची माहिती मिळणार कशी

जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या चिठ्ठीने इंजेक्शन स्वस्तात विक्री केले जाणार असले, तरी त्यासाठी गरिबीची नेमकी व्याख्या काय हे अजून स्पष्ट झाले नाही. त्यामुळे स्वस्तातले हे रेमडेसिव्हीर इंजेक्शन शासकीय प्रमाणे खासगी रुग्णालयातील पॉझिटिव्ह रुग्णांना मिळणार आहे. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शन नसल्यास बाहेरील औषधी दुकानातून इंजेक्शन मागविले जाणार आहे. मात्र, शासकीय रुग्णालयात रेमडेसिव्हिर इंजेक्शन साठा किती याबद्दल माहिती मिळणार कशी ? हा देखील अनुत्तरीत प्रश्‍न आहे. हे इंजेक्शन श्रीनाथ मेडिकल ॲड जनरल स्टोअर्स, श्रीनगररोड, वर्कशॉप कॉर्नर नांदेड येथे आणि प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र विष्णुपूरी नांदेड येथे उपलब्ध असेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who to trust to stockpile ‘RemediSvir’ The number of patients has come down, cheap ‘Remedesivir’ injections on two medicals from today Nanded News