esakal | राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही असे राज्यपालांचे वर्तन- विजय वडेट्टीवार
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी तथा लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन मंत्री वडेट्टीवार यांनी नुकसानीबाबत माहिती घेतली. त्यानंतर तुप्पा (ता. नांदेड) आणि मुखेड तालुक्यात पाहणी केली. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री विज वडेट्टीवार यांनी दिली.

राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही असे राज्यपालांचे वर्तन- विजय वडेट्टीवार

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राज्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेला खरीप हंगाम हिरावून घेतला. मुग, उडीद, सोयाबीन पाठोपाठ आता कापूस आणि ज्वारी हातची गेली. त्यामुळे अगोदरच कर्जाच्या व महागाईत होरपळणाऱ्या शेतकऱ्याला अधीकच फटका बसला. धीर खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व त्यांना तात्काळ आर्थीक मदत मिळावी यासाठी राज्यभर मंत्र्यांनी पाहणी दौरे सुरु केले आहे. रविवारी (ता. १८) नांदेड दौऱ्यावर आलेल्या मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शेतावर जावून पाहणी केली. त्यापूर्वी त्यांनी शासकिय विश्रामगृहात अधिकाऱ्यांशी व लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन माहिती घेतली. 

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी सकाळीच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी तथा लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन श्री.वडेट्टीवार यांनी नुकसानीबाबत माहिती घेतली. यावेळी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, अशी ग्वाही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली. 

हेही वाचानांदेड : महापालिकेचे सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल बनले शोभेची वस्तु -

राज्यपालांनी कोणत्या विचाराचा व भावनेचा चष्मा घातला 

रविवारी नांदेड दौऱ्यावर असताना मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे साठ टक्क्याच्यावर नुकसान झाले आहे. तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही सत्तर टक्के विमा काढला आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानासंदर्भात राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून जास्तीत मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे वड्डेटीवार यांनी यावेळी सांगितले. राज्यपाल कोश्यारी यांनी नेमका कोणत्या विचाराचा व भावनेचा चष्मा घातला आहे हे दिसून येत आहे. राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही, असे राज्यपालाचे वर्तन व वागणूक दिसून येत आहे. हे वर्तन गिनीज बुकमध्ये नोंद करण्यासारखे असल्याची टीकाही करत येणाऱ्या काळात त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

आमदार बालाजी कल्याणकरांची नाराजी

दौऱ्याची माहिती न दिल्याने शिवसेनेच्या आमदार बालाजी कल्याणकर यांनी स्थानिक प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दौऱ्याबाबत कल्पना दिली नसल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी आमदारांना समजावत शांत केले. सकाळी आढावा बैठकिला आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, लोकप्रतिनिधी यांची उस्थिती होती. 

येथे क्लिक करा - हिंगोली : आमदार सतीश चव्हाण यांना प्राध्यापकांनी घातले साकडे

शेतकऱ्यांच्या राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी 

यानंतर श्री. वडेट्टीवार यांनी तुप्पा (ता. नांदेड) शिवारातील नुकसान झालेल्या सोयाबीन व कापसाची पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांच्या राज्य सरकार खंबीरपणे पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतातील सोयाबीन व वेचणीला आलेला कापूस काळवंडला. शेतकऱ्यांनी आम्हाला न्याय द्या अशी भुमिका घेतल्याने आपण धीर सोडु नका सरकार आपल्यासोबत आहे. यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. 

loading image