नांदेड : महापालिकेचे सौरऊर्जेवर चालणारे सिग्नल बनले शोभेची वस्तु 

file photo
file photo

नांदेड : शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी मुख्य चौकात लावलेले सिग्नल बंद असतानाच पुन्हा जिल्हा नियोजन समितीकडून सव्वा कोटी रुपये खर्च करुन सौरऊर्जेवर चालणारे सात सिग्नल बसविण्यात आले आहेत. शहरात सात ठिकाणी लावण्यात आलेले सिग्नल सुरु केले नसल्याने ते शोभेची वस्तु बनली आहे. अगोदरच कर्जबाजारी असलेल्या महापालिकेने अदोगरचेच सिग्नल सुरु केले असते तर हा मोठा निधी वेगळ्या विकासकामासाठी वापरता आला असता अशी चर्चा शहरात एकवयास मिळत आहे. 

शहरातील वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिकेला जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी १४ लाखांची सात ट्रॅफिक सिग्नल उपलब्ध झाले आहेत. ट्रॅफिक सिग्नल हे सोलारवर आधारीत असल्यामुळे महापालिकेची वीज बिलाची बचत होणार आहे. नांदेड शहरामध्ये एकूण १५ ट्राफिक सिग्नल आहेत. त्यात तरोडानाका, राज कॉर्नर, आयटीआय चौक, फुले मार्केट, देना बँक आनंद नगर, अण्णाभाऊ साठे चौक, आयटीआय कॉलेज, वजिराबाद चौक, बाफना टी पॉइंट, देगलूर नाका, चिखलवाडी कॉर्नर, भगतसिंग चौक, लातूर फाटा, डॉक्टर लेन आदी ठिकाणी ट्रॅफिक सिग्नल बसवलेले आहेत. त्यातील किरकोळ कारणामुळे बरेच सिग्नल बंद आहेत. ते सुरू करण्यासाठी महापालिका प्रयत्न करत नसल्याचे दिसुन येते. 

महापालिकेच्या वीज बिलाची मोठी बचत होणार 

शहरामध्ये वाहतुकीचा (ट्रॅफिकचा) ताण कमी करण्यासाठी सोलरवर चालणारी सात ट्रॅफिक सिग्नलसाठी जिल्हा नियोजन समितीने एक कोटी १४ लाखाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यातून सोलार पॉवर ऑपरेटर ॲन्ड वायरलेस ट्राफिक सिग्नल -३ तर सोलार बेस्ट टेबल ट्राफिक सिग्नल- ४५९ सिग्नल महापालिकेकडे उपलब्ध झालेले आहेत. विशेष बाब म्हणजे हे ट्राफिक सिग्नल सोलरवर चालणारी आहेत. त्यामुळे महापालिकेच्या वीज बिलाची मोठी बचत होणार आहे. 

येथे बसविण्यात आली आहेत ट्राफिक सिग्नल

रेल्वे स्टेशन, वसंतराव नाईक चौक, शिव मंदिर चैतन्य नगर, डॉक्टर शंकरराव चव्हाण पुतळा व्हीआयपी रोड टी पॉईन्ट, भाग्यनगर टी पॉईन्ट, महाराणा प्रताप चौक या ठिकाणी सिग्नल बसविण्यात आलेली आहेत. लवकरच ट्रॅफिकचे उपयोगासाठी सुरू करण्यात येणार असले तरी मागील आठ दिवसापासून बसविण्यात आलेले हे फिरते सिग्नल सध्या तरी बंद आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com