ग्रामपंचायत निवडणुक : दाभडमध्ये सासू- सुनेच्या लढतीत कोण बाजी मारणार याकडे लागले जिल्ह्याचे लक्ष

लक्ष्मीकांत मुळे
Monday, 11 January 2021

दाभड (जिल्हा नांदेड) येथील एका लढतीने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. ही लढत जरा हटकेच आहे. तशी नात्याने पारंपरिक आहे

अर्धापूर ( जिल्हा नांदेड ) : सासू- सुनेचे नाते जितके नाजूक तितकेच जबाबदारीचे. चित्रपटातून खाष्ट सासुचे पात्र रंगविलेले जाते. काही सासु असतीलही.तसेच सुनबाई काही आता मागे राहिल्या नाहीत. नाटकात चित्रपटात, मालीकेत एकमेकांना शह- कटशह देण्याचे प्रसंग पहिले आहे. यात आता राजकारण, निवडणुकीची भर पडली आहे. सध्या राज्यभर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जवळचे नातेवाईक, भाऊ, मित्र एकमेकांच्याविरुद्ध निवडणूक लढवित आहेत.

दाभड (जिल्हा नांदेड) येथील एका लढतीने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. ही लढत जरा हटकेच आहे. तशी नात्याने पारंपरिक आहे. ही लढत सासूबाईं विरुद्ध सुनबाई अशी होत आहे. होणार सरपंच मी या गावची असे म्हणत सूनबाई निवडणूक लढवित आहेत. तर सासूबाईसुध्दा तेव्हड्याच तयारीने निवडणूक लढवित आहेत. विशेष म्हणजे या दोघींनी गेल्या निवडणुकीत एकाच पॅनलमधून निवडणूक लढविली होती.

हेही वाचा ऐकावे ते नवलच : देगलुरच्या 'या' गावात दाम्पत्य सात वार्डातून निवडणूक रिंगणात

दाभड ग्रामपंचायत नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चेत 

अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायतचा निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. या ठिकाणी सासूविरुद्ध सुनबाई असी लढत सुरु असून कोण बाजी मारणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या कारणामुळे दाभड ग्रामपंचायत नांदेड जिल्ह्यामध्ये चर्चेत असुन दाभड ग्रामपंचायत सरपंच पदी रेखा दादज्वार यांनी काम बघितले होते. पण ग्रामसभा वेळेवर न घेतल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यांच्यानंतर दाभड ग्रामपंचायतचा पदभार सुनबाई संगीता दादज्वार यांनी घेतला. सरपंचपदी विराजमान झाल्यानंतर ग्रामपंचायत कार्यकाळ संपल्याने पुन्हा ग्रामपंचायत सदस्य होण्यासाठी सासूविरुद्ध सुनबाई असा सामना लागला आहे.

गावच्या विकासाच्या तिजोरीची चाबी सासूबाईकडे जाणार की सुनबाईकडे 

अर्धापूर तालुक्यातील आर्थिक मिळकतीच्या बाबतीत सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून दाभड ग्रामपंचायतला ओळखल्या जाते. येथील ग्रामपंचायत नऊ सदस्यांची असून एक उमेदवार बिनविरोध निवडून आला. ग्रामपंचायतीच्या तीन वार्डातील आठ जागांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक दोनमधून सासुबाई रेखा दादज्वार व सुनबाई संगीता दादज्वार यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. दोन वेगवेगळ्या पॅनलमधून निवडणूक लढवली जात आहे. या  निवडणुकीमध्ये सासुबाई की सुनबाई यापैकी कोण बाजी मारणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तसेच गावच्या विकासाच्या तिजोरीची चाबी सासूबाईकडे जाणार की सुनबाईकडे हे मतमोजणीनंतर कळेल.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat elections: In Dabhad, the district's attention is focused on who will win the mother-in-law's battle nanded news