Video - ग्रामपंचायतने गावासाठी उभारले सुरक्षाकवच, कुठली आहे ही ग्रामपंचायत? ते वाचाच

प्रमोद चौधरी
Tuesday, 26 May 2020

कोरोना विषाणुने शहरासह ग्रामीण भाग तसेच वाडी तांड्यांवरही शिरकाव केल्याने ग्रामीण भागामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे प्रत्येकजण स्वतःसह, कुटुंबाची आणि गावकऱ्यांचीही काळजी घेताना दिसत आहे.

नांदेड :  कोरोना विषाणूचा शिरकाव आपल्या गावात होऊ नये म्हणून प्रत्येकजण ग्राम पातळीवर काळजी घेत आहेत. तशीच काळजी कामठा (ता.अर्धापूर) ग्रामपंचयतने घेतल्यामुळेच अद्यापतरी गावात कोरोनाचा शिरकाव झाला नसल्याचे सरपंच शिवलिंग स्वामी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 

कामठा(ता.अर्धापूर) हे गाव सुमारे १० हजार लोकसंख्येचे असून एक हजार २८८ कुटुंब गावात राहतात. कोरोना विषाणूपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी २४ मार्च पासूनच ग्रामपंचायतने विशेष पाऊल उचलले होते. देशात लॉकडाउन घोषित होताच कामठा गावही लॉकडाऊन करून टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, संचालक आदींचा समावेश होता. त्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच आज कामठा गाव सुरक्षित असल्याचे सरपंच श्री. स्वामी यांनी सांगितले. 
 
अशी घेतली काळजी
कामठा गाव लॉकडाउन करून गावात येणाऱ्या व जाणाऱ्याची लेखी नोंद घेण्यात आली. आजही घेतली जात आहे. तसेच कोरोना विषाणचा संसर्ग होवू नये म्हणून गावात प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर, मास्क आणि साबणचे किट वाटप करण्यात आले. बाहेरगावाहून आलेल्यांची स्वतंत्र नोंद करण्यात येत असून, त्यांना गावाबाहेरील बसवेश्वर विद्यालयामध्ये क्वारंटाइन करण्यात येत आहे. तसेच गावातून बाहेर जाणरा व्यक्ती कुठे चालला, काय काम आहे, किती वाजता येणार आदींच्या नोंदी घेतल्या जात आहे. 

हेही वाचाच - चायना टू मुखेड, व्हाया मुंबई - पुणे

संपूर्ण गावात फवारणी 
कामठा गावामध्ये सर्व मजुर असल्याने त्यांची सुरक्षा करणे हे ग्रामपंचायतीचे कर्तव्य आहे. त्यामुळे कोरोनापासून त्यांचे संरक्षण व्हावे, त्यांना कुठल्याही प्रकारचा संसर्ग होवू नये म्हणून ग्रामपंचायतच्या वतीने संपूर्ण गावात फवारणी केली जात आहे.  नियमित नाली सफाई केली जात असून, कचरागाडीही दररोज गावामध्ये फिरवली जात आहे.  हात पंप तसेच ट्रॅक्टरच्या साह्याने अशा दोन्ही पद्धतीने गावामध्ये फवारणी केली जात आहे. 

येथे क्लिक कराच - VIDEO : एक जंतू... दिल्ली सोडली नाही... गल्ली सोडली नाही!

कामठा गावामध्ये सर्व शेतकरी, मजूरवर्ग असून त्यांची कोरोना विषाणुपासून संरक्षण व्हावे म्हणून गाव लॉकडाउन करण्यात आले. त्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, चेअरम आदींनी सुरक्षेविषयीचे धनुष्य उचलल्यामुळेच आज कामठा गाव सुरक्षित आहे.
- शिवलिंग स्वामी (सरपंच, कामठा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Gram Panchayat Has Setup Security The Village Nanded News