आजीचा खून करणाऱ्या नातवाला कोठडी

प्रल्हाद हिवराळे
Saturday, 9 May 2020

धर्माबाद उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केले अटक.

उमरी (जिल्हा नांदेड) : आजीचा खून करून तिच्या अंगावरील दागिण लंपास करणाऱ्या फरार नातवाला अखेर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने शुक्रवारी (ता. आठ) केली. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने तिन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे. 

नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातल्या शिरुर येथे (ता. २५) फेब्रुवारी रोजी ८५ वर्षीय वयोवृध्द महिला किशनबाई पुंडलीक पडोळे हिची दुपारी दोन वाजल्याचे सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने तिचे डोक्यात लाकडी ढीपली मारून निर्घृण खुन करुन व गळ्यातील सोन्याची पोत व कानातील बाळ्या काढून घेतल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटने संदर्भात मयत वृध्द महिलेचा नातु साईनाथ गंगाधर पडोळे रा. शिरुर (ता. उमरी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरी पोलीस स्थानकात अज्ञात आरोपी विरोधात ता. २६ फेब्रुवारी रोजी खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा संचारबंदी... वाळू माफियांची मात्र चांदी

चोरलेला मुद्देमाल जप्त 

वृध्द महिलेच्या खुनाच्या गंभीर गुन्ह्याचा तपास लावण्यात उमरी पोलीस प्रशासनाला यश येत नसल्यामुळे सदरील गुन्ह्याचा तपास जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्याकडे देण्यात आला. या गभीर घटनेचा तपास जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या खुनाचा तपास विविध पध्दतींचा अवलंब करून तसेच तांत्रिक पुरावे हस्तगत करून ता. सहा मे रोजी आरोपी शिवाजी रावसाहेब पडोळे (वय ३०) रा. शिरुर (ता. उमरी) यास अटक केली. सदरील आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस तिन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी तपासादरम्यान आरोपीने वृध्द महिलेच्या अंगावरील काढून घेतलेले गळ्यातील सोन्याची पोत व कानातील सोन्याच्या बाळ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असून पुढील तपास चालु असल्याचे समजते.

यांनी घेतले परिश्रम 

सदरील खुनाचा तपास यशस्वीपणे करणाऱ्या उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या पथकाचे पोलीस उपनिरिक्षक गणेश राठोड, उमरी पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक श्री. अनंत्रे, सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. शेवाळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक व त्यांच्या पथकातील कर्मचारी, धर्माबाद पोलीस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक श्री. सनगले, पोलिस नाईक श्री. शितळे, फिरोज शेख, श्री. घोंसले या सर्वांच्या मदतीने कोवीड-१९ प्रतिबंध बंदोबस्ताचे आव्हान सांभाळत सदरील गंभीर गुन्ह्याचा तपास जलद गतीने यशस्वीपणे करून घटनेतील आरोपीला जेरबंद केल्याने पथकाचे अभिनंदन होत आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Granddaughter custudy for murdering grandmother nanded news