जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढताच, शनिवारी २२ नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

शुक्रवारी २१ रुग्णांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी (ता.१३) पुन्हा २२ रुग्णांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

नांदेड : जून महिणा लागताच कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी २१ रुग्णांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर शनिवारी (ता.१३) पुन्हा २२ रुग्णांचे स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २५६ इतकी झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली. 

शनिवारी पंजाब भवन यात्रीनिवास येथील पाच आणि डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील तीन रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शुक्रवारी (ता.१२) तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात आलेल्या ९७ स्वॅब अहवाल शनिवारी (ता.१३) सायंकाळी पाचच्या दरम्यान प्राप्त झाले. यात ६२ स्वॅब नमुने अहवाल निगेटिव्ह तर २२ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 

नव्याने आलेल्या २२ पॉझिटिव्ह अहवालात २५, २८, २९, ३०, ३०, ३१, ३४, ३५, ३५, ४९, ५१, ५५ आणि ६७ वर्षांच्या १३ पुरुषांचा समावेश तर ३१, ३६, ४३, ४५, ४७, ४८, ४८, ४९ व ५५ वर्ष वयोगटातील नऊ महिलांचा समावेश असल्याचे डॉ. भोसीकर यांनी सांगितले.

हेही वाचा - जिल्ह्यातील उद्योग- व्यवसाय सुरु, पण कामगार काही मिळेना ​
या भागात सापडले पॉझिटिव्ह रुग्ण
नव्याने सापडलेले पॉझिटिव्ह रुग्ण या भागातील चिखलवाडी परिसर एक पुरुष व एक महिला, विजय कॉलनी एक महिला, दिपनगर एक पुरुष, एच. आय. जी. कॉलनीतील एक महिला, झेंडा चौक एक महिला, स्वामी विवेकानंदनगर एक पुरुष, सोमेश कॉलनी एक महिला एक पुरुष, पद्मजा सिटी एक महिला, सिडको एक महिला, यशवंतनगर एक पुरुष, विणकर कॉलनी एक पुरुष, भाग्यनगर रोड एक महिला, संत ज्ञानेश्वरनगर एक पुरुष, न्यायनगर एक पुरुष, श्रीनकृष्णनगर तरोडा (ब्रु) एक पुरुष, विश्वदिपनगर एक पुरुष, महावीर चौक एक पुरुष, इतवारा एक पुरुष, चैतन्यनगर एक महिला, अर्धापूर तालुक्यातील कामठा येथील एक पुरुष अशा २२ पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. 

हेही वाचा - धनदांडग्यांचा मोफत धान्यावर डल्ला.....कुठे ते वाचा ​

१६३ स्वॅब अहवाल तपासणी सुरु

जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या २५६ इतकी झाली असून, त्यापैकी उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १३ वर पोचली आहे. कोरोना आजारातून १३८ रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याचे डॉ.भोसीकर यांनी सांगितले. शनिवारी (ता.१३) पुन्हा नव्याने १६३ स्वॅब अहवाल तपासणीकरिता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, त्याचा अहवाल रविवारी सायंकाळपर्यंत येण्याची शक्यता असल्याचे डॉ. भोसीकर म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As The Graph Of Corona Increases In The District 22 New Patients On Saturday Nanded News