esakal | जिल्ह्यातील उद्योग- व्यवसाय सुरु, पण कामगार काही मिळेना
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

मराठवाड्यातील विविध जिल्‍ह्यात कामानिमित्त स्थिरावलेले परप्रांतिय लॉकडाउन दरम्यान गावी निघून गेले आहेत. पाचव्या लॉकडाउनमध्ये मराठवाड्यातील उद्योग - व्यवसाय सुरु झाले असले तरी, त्याठिकाणी कामगार मिळत नसल्याने अडचणी येत आहेत.   

जिल्ह्यातील उद्योग- व्यवसाय सुरु, पण कामगार काही मिळेना

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : मराठवाड्यात सर्वाधिक मजुर औरंगाबाद, जालना जिल्ह्यात विविध कंपन्या आणि गजाळीच्या कामावर आहेत. त्या पाठोपाठ नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक मजुर कारागीर आणि स्वतःचे उद्योग व्यवसायानिमित्त स्थिरावले आहेत. यात अनेकांनी बेकरी, पाणीपुरी, स्वीटमार्ट, फर्निचर, पीओपी, बांधकाम व इतर व्यवसयांसोबतच सुवर्णकला क्षेत्रात काम करत होते. 

परंतू लॉकडाउन होताच अनेकांचे कामे बंद झाले. तळहातावर पोट असलेले बिहार, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल येथील हजारो कामगारांवर उपसमारीची वेळ येऊन ठेपल्याने त्यांनी गावी जाण्यासाठी हालचाली सुरु केल्या. राज्य सरकारने त्यांच्यासाठी नांदेड विभागातून जालना आणि औरंगाबाद येथुन विशेष श्रमिक रेल्वे सुरु करण्याचे ठरवले. दरम्यान राज्य सरकाराने बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगात येथील कामगारांना घरी सोडण्याकरिता १८ विशेष रेल्वे चालविल्या असून, त्याद्वारे २३ हजार ५०० कामगार आपल्या गावी पोहोचले आहेत.  

हेही वाचा - Video - देशाला आहे कुशल मनुष्यबळाची गरज - डॉ. हनुमंत भोपाळे ​

बांधकाम व्यवसायात कामगारांची कमी

आपापल्या गावी गेलेल्या २३ हजार ५०० कामगार आणि व्यवसायिकांमध्ये नांदेड जिल्ह्यातील साडेचार हजार कामगारांचा समावेश आहे. त्यामुळे हे कामगार बांधकाम व्यवसाय, फर्निचर, केटरिंग, सुवर्णकाम तसेच लहान मोठ्या दुकानात काम करणार आहेत. त्यामुळे पाचव्या लॉकडाउनमध्ये उद्योग व्यवसायांना सूट दिल्याने सर्व उद्योग व्यवसाय सुरु झाले आहेत. परंतु, कामगारच नसल्याने असंख्य अडचणी निर्माण झालेल्या आहेत.   

हेही वाचा-  नांदेडमध्ये गुटखा माफियांची चलती

भविष्यात कामगारांचा प्रश्न ऐरणीवर
जिल्ह्यात दोन हजाराच्या जवळपास सुवर्ण कारागीर काम करत होते. लॉकडाउनमुळे यातील काही कारागीर त्यांच्या राज्यात परतले आहेत. लॉकडाउनमध्ये सिझन संपले, त्यामुळे पावसाळा असला तरी, भविष्यात व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून काही कारागिरांची जेवण, राहण्यासाठीची सोय काहींनी केली आहे. त्यामुळे सध्या जरी कारागिरांची चिंता नसली तरी, भविष्यात कामावर परिणाम होऊ शकतो. 
- सुधाकर टाक (सराफा असोसिएशन संघटना)   

खाद्यतेल निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता
एमआयडीसीतील साडेतीन हजाराच्या जवळपास कामगार त्यांच्या राज्यात परत गेले आहेत. त्यामुळे ड्रक्स, खाद्यतेल, फर्टिलायझर्स अशा महत्वाच्या कंपनीचे काम बंद पडण्याच्या मार्गावर आहे. कामगार नसल्याने भविष्यात खाद्य तेल निर्मितीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  
- सुरेश लोट (जिल्हाध्यक्ष भारतीय कामगार सेना)