शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांना जिल्हा शिवसेनेच्या वतीने अभिवादन

file photo
file photo

नांदेड : हिंदुऱ्हदय सम्राट, शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार (ता. २३) जानेवारी रोजी शिवसेनेचे नांदेड (उत्तर) चे जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे पाटील यांच्या संपर्क कार्यालयात ध्वजारोहण व मिठाई वाटप करण्यात आली. यासह शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. 

शहराच्या सांगवी परिसरातील आसना बायपास येथील जिल्हाप्रमुख श्री कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयासमोर शनिवारी (ता. २३) सकाळी नऊ वाजता शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मिठाई वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला नांदेड (उत्तर) चे आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, सहसंपर्कप्रमुख डॉ. मनोजराज भंडारी, नांदेड (दक्षिण) चे जिल्हाप्रमुख आनंद तिडके बोंढारकर, तालुकाप्रमुख जयंत कदम, महानगरप्रमुख अशोक उमरेकर, शहरप्रमुख सचिन किसवे, उपशहरप्रमुख रमेश कोकाटे यांच्यासह आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, दत्ता पाटील कोकाटे, डॉ. भंडारी, धोंडू पाटील, श्री बोंढारकर यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेबांनी घालून दिलेल्या मार्गावर आम्ही चालत असून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही पक्ष बळकट करण्याचे काम करत राहू असा विश्वास दत्ता पाटील कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केला. शिवसेनेच्या २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण हा वसा घेऊन आम्ही संबंध जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक व लोकप्रतिनिधी ग्रामिण भागातील अन्यायग्रस्त व्यक्तींना व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी सांगितले. 

यानंतर हनुमानगड, परिसरातील रामनगरच्या सुमन बालगृहात दत्ता पाटील कोकाटे यांच्या वतीने निराधार बालकांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. तसेच नेरली कुष्ठधाम येथील कुष्ठरोग्यांना तालुकाप्रमुख जयंत कदम यांच्या वतीने सुरुची भोजन देण्यात आले. तालुका संघटक नवनाथ काकडे यांनी आपल्या परिसरातील नसरतपुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. उमेश दिघे यांनी गजानन मंदिर परिसरात असलेल्या वृद्धाश्रमात वृद्धांना अन्नदान वाटप केले. त्यानंतर वजिराबाद परिसरातील बाळासाहेब ठाकरे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. या विविध कार्यक्रमाला शहरातील उपशहर प्रमुख माधव कोकाटे, अंकुश कोकाटे, श्याम वानखेडे, संतोष भारसावडे, राजू गंडावार यांच्यासह शिवसेनेचे आदी पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com