
नांदेड : टाळेबंदीमधील सर्व निर्बंध उठवल्याने नागरिक बिनधास्त झाले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देऊनही लग्नसमारंभात नागरिकांची गर्दी होत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केल्या जात नसल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
ग्रामीण भागात मुलांचे किंवा मुलींचे लग्न म्हटलं की संपूर्ण गावाला निमंत्रण द्यावं लागतं. कोणाला सांगायचे आणि कोणाला नाही, हा प्रश्न सध्या वर-वधू मंडळींपुढे उभा आहे. वरपिता नाराज होईल म्हणून गावकरी लग्नाला हजेरी लावतात. लग्न जवळचे असेल तर सर्व खबरदारी बाळगत लग्नाला गेले पाहिजे, असा समज रुढ झालेला आहे.
फेसबुक व्हाटसअपवर लग्नाची पत्रिका टाकून ‘हेच निमंत्रण समजून लग्नाला हावे’, असे आग्रहाचे निमंत्रण दिले जाते. ज्यांना कोरोनाचे गांभीर्य नाही, त्यांना लग्नाला जायला एवढे कारण पुरेसे आहे. काही वरपिता कमी वऱ्हाडी मंडळीत लग्न लावायला तयार असतात, तसे त्यांचे नियोजन असते. मात्र, नवरदेव, नवरी यांचा सोशल मीडियावरचा निमंत्रणाचा भडीमार थांबता थांबत नाही. नवरा-नवरी मोबाईलमधून काय करत आहेत? याचा पत्ता वरपित्याला नसल्याने लग्नात गर्दी होऊन स्वयंपाकाचे गणित अनेकदा कोलमडते आहे.
हे देखील वाचलेच पाहिजे- मित्राचा लग्नसोहळा आटोपून परतणाऱ्यांवर काळाचा घाला, अंबाजोगाईचे चार युवक जागीच ठार
ग्रामीण भागात लग्नाअगोदर स्वतंत्रपणे साखरपुडा असेल तर घरोघरी नातेसंबंधातील माणसांना पाठवून गावकऱ्यांना निमंत्रण दिले जातात. लग्न, साखरपुडा, टिळा लावणे सुद्धा इव्हेंट झाला आहे. तुमच्या कार्यक्रमाला गर्दी किती जमणार, यावर तुमचे सामाजिक वजन मोजले जाते. याच्या अगोदर या प्रकाराला कोणाचीच हरकत नसायची, पण कोरोना काळात आपण अनेक नियम शिकलो, असे नुसते म्हणत असतो. पण प्रत्यक्षात आपण नियम पाळत नाही. ग्रामीण भागात लग्नाला हजार पाचशे लोक सहज जमत आहेत. परंतु, हा प्रकार चिंताजनक तसेच धोकादायक आहे.
येथे क्लिक कराच - बिलोली तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू
५० जणांची परवानगी
विवाह सोहळा आयोजित करताना केवळ ५० जणांनाच परवानगी देण्यात येत आहे. मात्र अनेक सोहळ्यांमध्ये ३०० ते ४०० जण गोळा होताना दिसत आहेत. अनेकजण परवानगी सुद्धा घेत नसल्याचा प्रकार निदर्शनास येत आहे. अनेक मंगल कार्यालयामधये दररोज विवाह सोहळे पार पडत आहेत. मात्र शासनाला साधी सूचनाही देण्यात येत नाही. विवाह सोहळ्यात नियमांचे उल्लंघन होत असले तरी पोलिस व संबंधित यंत्रणेकडून दखल घेण्यात येत नसल्याने लग्नातील वाढती गर्दी चिंता वाढविणारी ठरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.