पालकमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर एकाच व्यासपीठावर, अनेकांच्या भुवया उंचावल्या

शिवचरण वावळे
Saturday, 23 January 2021

नांदेड ः नांदेड जिल्हा म्हटले की जसे अशोक चव्हाण यांचे नाव समोर येते तसेच त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या प्रताप पाटील चिखलीकरांचेही नाव येते. एकमेकांच्या कायम विरोधात असलेले पालकमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोघांना एकाच व्यासपीठावर बघण्याची संधी शनिवारी (ता. २३) अनेकांना मिळाली. निमित्त होते दिव्यांग साहित्य वाटपाचे. मात्र, अर्धा तास एकमेकांच्या जवळ बसले असले तरी ते एकमेकांशी बोलले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे. 

नांदेड ः नांदेड जिल्हा म्हटले की जसे अशोक चव्हाण यांचे नाव समोर येते तसेच त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या प्रताप पाटील चिखलीकरांचेही नाव येते. एकमेकांच्या कायम विरोधात असलेले पालकमंत्री अशोक चव्हाण आणि खासदार प्रताप पाटील चिखलीकर या दोघांना एकाच व्यासपीठावर बघण्याची संधी शनिवारी (ता. २३) अनेकांना मिळाली. निमित्त होते दिव्यांग साहित्य वाटपाचे. मात्र, अर्धा तास एकमेकांच्या जवळ बसले असले तरी ते एकमेकांशी बोलले नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याची चर्चा सुरू झाली आहे. 

राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे दोन्ही नेते राज्याचे राजकारणातील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जातात. संधी मिळेल तेव्हा दोन्ही विरोधक एकमेकांवर शब्दरुपी बाण सोडण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, शनिवारी दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर एकमेकाच्या बाजुला बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्याचे दिसून आले. 

हेही वाचा - शिक्षकांच्या कोरोना चाचणीमुळे लॅबवरील ताण वाढला; शुक्रवारी १५ जणांचे आहवाल पॉझिटिव्ह; दोघांचा मृत्यू ​

दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र दिव्यांग भवन - चव्हाण 

दिव्यांग व्यक्तींच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी तसेच त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी नांदेडच्या सामाजिक न्याय विभागाच्या इमारतीमध्ये तात्पुर्त्या स्वरुपात दिव्यांग भवन उभारण्यासाठी प्रयत्न करणार असून, भविष्यात केंद्र व राज्य सरकार मिळुन दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी स्वतंत्र दिव्यांग भवन उभारु, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय यांच्या वतीने सामाजिक अधिकारीता शिवीराच्या माध्यमातुन शनिवारी (ता. २३) राष्ट्रीय वयोश्री योंजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांगांना निशुल्क कृत्रिम अवयव साहित्य व उपकरणाचे ओम गार्डन येथे वाटप करण्यात आले. 

यांची होती उपस्थिती 

या प्रसंगी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार अमर राजुरकर, आमदार श्‍यामसुंदर शिंदे, आमदार मोहन हंबर्डे, आमदार राजेश पवार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, महापौर मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, महापालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त तेजश माळवदकर, जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी उमाकांत तोटावाड यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्री थावरचंद गेहलोत यांनी आॅनलाइनद्वारे दिव्यांगाच्या योजनेबंद्दल केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनेबद्दल माहिती दिली व बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिव्यांगांच्या पुर्नवसनासाठी स्वतंत्र दिव्यांग भवन व्हावे अशी सुचना केली. त्या सुचनेची योग्य ती दखल घेतली जाईल व दिव्यांग भवनाचा विचार केला जाईल, असे आश्‍वासीत केले. 

हेही वाचा- तरुणावर प्राणघातक हल्ला; नांदेडच्या बारडध्ये ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

दिव्यांगांसाठी आता २१ योजना - चिखलीकर 

पूर्वी दिव्यांगांसाठी केवळ सात योजना होत्या. केंद्र सरकारने त्या वाढवून २१ योजना केल्या आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना ११ कोटी रुपयांचे विविध प्रकारचे साहित्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. जिल्ह्यातील दिव्यांगाना मान्यवरांच्या हस्ते व्हील चेअर, स्मार्टफोन, स्मार्ट स्टीक, श्रवण यंत्र, इलेक्ट्रॉनिक (चार्जेबल) थ्री व्हिलर सायकल, स्मार्ट वॉच, चष्मा, कृत्रिम अवयव अशा विविध साहित्याचे वाटप करण्यात आले.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Ashok Chavan and MP Pratap Patil Chikhlikar on the same platform, many raised eyebrows Nanded News