
तर पाणी नियोजनची बैठक घेण्यासाठी प्रशासन व पालकमंत्र्याने वेळच मिळत नाही काय,पेरणीची वेळ निघून गेल्यावर पाणी नियोजन होणार काय आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
अर्धापूर (जिल्हा नांदेड): यंदा पाऊस चांगला झाल्याने धरणे शंभर टक्के भरली आहेत. रब्बीच्या पेरण्या व ऊस लागवड खोळंबली आहेत. लागवड व पेरणीच्या वेळी वेळेवर पाणीच भेटत नसेल तर शंभर टक्के धरणे भरून काय उपयोग आहे असा प्रश्न शेतक-यातून उपस्थित केला जात आहे. तर पाणी नियोजनची बैठक घेण्यासाठी प्रशासन व पालकमंत्र्याना वेळ मिळत नाही काय, पेरणीची वेळ निघून गेल्यावर पाणी नियोजन होणार काय आसा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
यंदा जोरदार पाऊस झाल्याने जिल्हातील बहुतांश धरणे पुर्ण क्षमतेने भरली आहेत. खरिपाच्या हंगामावर परतीच्या पावसाने घाला घातल्याने खूप मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, आदी पिके पाण्यासोबत वाहून गेल्याने खूप मोठा अर्थिक फटका बसला आहे. शेतक-यांच्या हाततोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने सर्व आशा आणि भिस्त येणा-या रब्बीच्या हंगामावर आहे.
हेही वाचा - पंडीत जवाहरलाल नेहरु यांचे कार्य व विचार सर्वांनाच प्रेरणा देणारे- गुणवंत मिसलवाड -
अर्धापूर तालुक्यातील शेतीला उर्ध्वपेनगंगा व पुर्णा प्रकल्पाचे मिळते .हे दोन्ही प्रकल्प शंभर टक्के भरली आहेत. युतीच्या शासन काळात पाणी पाण्याचे नियोजन मंत्रालयात होत होते. पण गेल्या वर्षी जिल्हास्थरावर पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या आध्यक्षतेखाली पाणी पाळी नियोजन करण्यात आले होते. पाटबंधारे विभागाने आपली तयारी सुरू केली असून कालव्याची, वितरेकेची साफसफाई करण्यात येत आहे.
पाणी पाळी नियोजन बैठक आक्टोंबरच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येते. पण यंदा धरणे भरूनही पाणी पाळी नियोजनचा पत्ता नाही. याचा परिणाम रब्बीच्या पेरण्या व ऊस लागवडीवर होत आहे. ऊस ऊशीरा लावला तरी तोड उशिरा होते. याचा परिणाम उत्पन्नावर होतो. पाणी पाळी नियोजन तात्काळ करून शेतक-यांची चिंता दुर करण्यात यावी आशी मागणी शेतक-यातून होत आहे.