Gulabrao Patil : अजितदादांची ‘एंट्री’ नसती, तर आमचेही शंभर आमदार असते; मंत्री गुलाबराव पाटील यांचा दावा
Maharashtra Politics : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दावा केला की, अजित पवार यांची 'एंट्री' नसती, तर शिवसेना १०० आमदार जिंकू शकली असती. त्यांनी यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत महायुतीच्या यशावर प्रकाश टाकला.
नांदेड : एकनाथ शिंदे या माणसाने शिवसेना वाचवली, भगवा आणि बाळासाहेबांचे विचार वाचवले. हा माणूस जादूगर आहे, नांदेड जिल्ह्यात महायुतीचे नऊ आमदारही त्यांचीच जादू आहे. आम्ही विधानसभेला ऐंशी जागा लढलो आणि साठ जिंकलो.