अट्टल गुन्हेगार व अपहरणकर्ता विकास हटकर पोलिस चकमकीत जखमी

प्रल्हाद कांबळे
Friday, 7 August 2020

ही घटना नांदेड शहराच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर परिसरात शुक्रवारी (ता. सात) सायंकाळी सहाच्या   सुमारास घडली.

नांदेड : लोहा शहरातून एका सोळा वर्षीय युवकाचे अपहरण करुन त्याच्या आईला फोनवरुन २० लाखाची खंडणी मागणारा अट्टल गुन्हेगार पोलिसांच्या चकमकीत गंभीर जखमी झाला. ही घटना नांदेड शहराच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर परिसरात शुक्रवारी (ता. सात) सायंकाळी सहाच्या  सुमारास घडली. पोलिसांनी चार जणांना अटक केली. आरोपीकडून अपहरण केलेला युवक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 

लोहा शहरातील बालाजी मंदीर परिसरात राहणाऱ्या जमुनाबाई संतोष गीरी यांचा मुलगा शुभम संतोष गीरी (वय १६) याचे बुधवारी (ता. पाच) सायंकाळी साडेचारच्या सुमारास अपहरण केले होते. त्यानंतर जमुनाबाईला २० लाखाची खंडणी मागितली. पैसे नाही दिले तर तुझ्या मुलाला ठार मारुन टाकतो. अशी धमकी दिल्यानंतर जमुनाबाई हिने लोहा पोलिस ठाण्यात जावून मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणासह आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस निरीक्षक भागवत जायभाये करत होते. 

हेही वाचा नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकल्पात झाला एवढा पाणीसाठा

लोहा येथील शुभम गीरीचे केले होते अपहरण

शुभमचे अपहरण करणारा विष्णुपूरी (ता. नांदेड) येथील अट्टल गुन्हेगार विकास हटकर हा असल्याची खात्री पोलिसांना पटली. त्याच्या मोबाईल सीडीआरवरुन व त्याने केलेल्या फोनवरुन पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. अपहरण केलेल्या युवकाला घेऊन तो नांदेडच्या निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर भागात एका घरात दडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांचे पथक कार्यरत झाले. 

निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर भागात विकास हटकर जखमी

श्री. भारती हे आपल्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निळा रस्त्यावर असलेल्या महादेवनगर भागात विकास हटकर हा अपहरण केलेल्या मुलासह दबा धरुन बसला असल्याची गुप्त माहिती मिळताच त्याला सापळा लावला. मात्र पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजताच शुभम गीरी या मुलाला घेऊन तो पुयनी मार्गे पळत सुटला. यावेळी पोलिसांनी त्याला थांबण्याचे सांगितले. मात्र तो थाबला नाही. अखेर पोलिसांनी त्याचा पाठलाग करत शेवटी विकास हटकर याच्या पायावर गोळी मारली. यात तो जखमी झाला. आणि जागीच पडला. यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून घातक शस्त्र जप्त करुन अपहरण केलेल्या मुलाला ताब्यात घेऊन त्याला धीर दिला. 

येथे क्लिक करापोलिसांसाठी गुड न्यूज : बदल्यांचा मुहूर्त स्वातंत्र्य दिनापर्यंत, फिल्डींगसाठी एक आठवडा

नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले 

जखमी विकास हटकर याला विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री उशिरा त्याच्या ताब्यातून सुटका करुन घेतलेल्या मुलाला त्याच्या नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी लिंबगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. आरपी विकास हटकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर खंडणी, लुटमार, चोरी, खूनाचा प्रयत्न आदी गंभीर गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही घटना वा-यासारखी शहरात पसरली आणि सर्वत्र हाहाकार उडाला. आठवड्यातील फायरिंगची ही दुसरी घटना असून पहिल्या फायरिंगमध्ये एका कुख्यात गुंड ठार झाला होता. यानंतर ही फायरींगची दुसरी घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hardened criminal and kidnapper Vikas Hatkar injured in police encounter nanded news