esakal | यामुळे जिल्ह्यातील ‘डेंगी’ आजारी रुग्णसंख्या झाली कमी 
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

दरवर्षी एप्रिल आणि मे महिण्यामध्ये डेंगीचा उद्रेक झालेला असतो. यंदा मात्र कोरोनाच्या भीतीने घरतील कुरल बंद आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा होत असल्यामुळे जिल्ह्यातील डेंगी आजाराची रुग्ण संख्या अतिशय कमी झाल्याने आरोग्य विभागासाठी दिलासादायक बातमी आहे.

यामुळे जिल्ह्यातील ‘डेंगी’ आजारी रुग्णसंख्या झाली कमी 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : डेंगीचा प्रसार हा एडिस इजिप्टाय नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी आठ दिवसापेक्षा जास्त साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. यानंतर अंड्याचे रुपांतर डासात होते. म्हणून नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे.

राष्ट्रीय डेंग्यु दिन शनिवार (ता. १६) मे २०२० ला साजरा केला जाणार आहे. त्याअनुषंगाने हा जिल्ह्यातील डेंगी आजाराचा आढावा घेण्यात आला आहे. यातून उन्हाळा सुरु होताच जिल्ह्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होते. तसे नागरिकांकडून पाणी साठविण्याचे प्रमाण देखील जास्त वाढल्याचे आढळून येते. म्हणून दरवर्षी एप्रिल व मे महिण्यामध्ये साठविलेल्या पाण्यात ‘एडिस इजिप्टाय डास’ अंडी घालतात आणि यातूनच डासांची उत्पत्ती होते. असा आत्तापर्यंतचा आरोग्य विभागाचे अनुमान आहे. परंतु यंदा कोरोनाच्या भीतीने घरतील कुलर, एसी, पंखे बंद ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे पाण्याचा अतिवापर नाही. परीनामी डेंगी रुग्णांची संख्या कमी झाली असल्याचा दावा आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे. 

हेही वाचा- नांदेडला दिलासा : अबचलनगरच्या पहिल्या रुग्णाची कोरोनावर मात...
 
डेंगी ताप आजारात रुग्णास दोन ते सात दिवस तीव्र स्वरुपाचा ताप येतो. डोके, सांधे, स्नायु दु:खीचा त्रास होतो. रुग्णास उलट्या होतात. डोळ्याच्या आतील बाजू दुखणे, अंगावर पुरळ येणे, नाक-तोंड यातून रक्त स्त्राव होतो. अशक्यतपणा, भुक मंदावते, तोंडाला कोरड पडते ही लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांनी वेळेत जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन मोफत तपासणी व उपचार करुन घेणे आवश्यक आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील पाच वर्षांची डेंग्युची परिस्थिती पुढीलप्रमाणे आढळते. ( घेतलेले तपासलेले रक्तजल नमुने) कंसाबाहेर डेंग्यु दुषित रुग्ण, नंतरच्या (कंसात मृत्यू रुग्ण). सन २०१६ - (७७६) १८२ (एक). सन २०१७ - (९५३) २०० (निरंक). सन २०१८ - (१२४५) ३७८ (निरंक). एप्रिल - २०१९ -(१५२७) ४७३ (निरंक) तर ३० एप्रिल २०२० अखेर- (१४३) ५९ (निरंक).

हेही वाचा- कुणी आणली आशा वर्करवर उपासमारीची वेळ ?...वाचा

डेंगीचा उद्रेक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी 

घराभोवताली पाणी साचू देवू नका. घरातील पाण्याचे सर्व साठे आठवडयातून एकदा रिकामे करा. परिसरातील खड्यात पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. शेततळ्यात नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करुन गप्पी मासे सोडावीत. झोपतांना पूर्ण अंगभर कपडे घालावीत. घरी किटकनाशक औषधीचे फवारणी पथक आल्यास घर संपूर्ण फवारुण घ्यावे. घराच्या छतावरील फुटके डब्बे, टाकाऊ टायर्स, कप, मडकी इत्यादींची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या पाईपला वरच्या टोकाला जाळी किंवा पातळ कपडा नेहमी बांधावा. डेंगी तापाची लक्षणे आढळल्यास तपासणी व उपचार सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात, ग्रामीण रुग्णालयात व जिल्हा रुग्णालयात मोफत उपलब्ध करुन दिली आहे.

आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे
नागरिकांनी दक्षता घेतल्यास डासाची उत्पत्ती थांबविण्यास मोठी मदत होईल व डास चावणार नाहीत. योग्य काळजी, वेळीच केलेला उपचार प्रत्येकाला होणाऱ्या आजारापासून दूर ठेवतो. त्यासाठी किटकजन्य आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्वांनी हातभार लावून आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हा हिवताप अधिकारी
- डॉ. आकाश देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी

loading image
go to top