Nanded Heatwave : नांदेड @ ४२ अंशावर; गुरुवारी सूर्य कोपला, या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद
Nanded News : गुरुवारी नांदेडमध्ये यंदाच्या वर्षातील सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उष्माघाताचा धोका वाढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नांदेड : जिल्ह्यात मागील आठवड्यात जवळपास दोनवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्यानंतर उन्हाचे चटके बसत आहेत. नांदेडवर गुरुवारी (ता. १७) सूर्य कोपला असून, तापमानाचा पारा ४२ अंशांवर पोचला.