सर्वच तालुक्यात दमदार पाऊस

NND11KJP01.jpg
NND11KJP01.jpg

नांदेड : जिल्ह्यात मंगळवारी रात्री झालेल्या पावसानंतर बुधवारी (ता. दहा) रात्री सर्वच तालुक्यात तालुक्यात पाऊस झाला. गुरुवारी (ता. ११) सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात एकूण २२३.८४ मिलिमीटर, तर सरासरी १३.९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद मंडळात ८५ मिलीमीटर झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टी नोंदली गेली.

सलग दुसऱ्या दिवशी पाऊस 
जूनचा पहिला आठवडा कोरडा गेल्यानंतर मृग नक्षत्रात बुधवारी पावसाचे आगमण झाले होते. यानंतर सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाचे प्रमाण बरे राहिले. हा पाऊस नांदेड, देगलूर, मुदखेड, मुखेड, हिमायतनगर, माहूर, अर्धापूर, लोहा तालुक्यात चांगला झाला. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत जिल्ह्यात एकूण २२३.८४ मिलिमीटर, तर सरासरी १३.९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

मुक्रमाबाद मंडळात अतिवृष्टी
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद मंडळात ८५ मिलीमीटर झाल्यामुळे या ठिकाणी अतिवृष्टी नोंदली गेली. या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केल्याची माहिती मिळाली. जिल्हा प्रशासनासह कृषी विभागाने शेतकऱ्यांना शंभर मिलीमीटर पावसानंतरच पेरणी करण्याचे आवाहन केले होते. परंतु पावसाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी पेरणीला प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. 

तालुकानिहाय झालेला पाऊस
पाऊस मिलीमीटरमध्ये)
नांदेड २६.६३, मुदखेड १५.६७, अर्धापूर १२, भोकर ११.२५, उमरी तीन, कंधार सात, लोहा १३.८३, किनवट १३, माहूर १७.७५, हदगाव १०.७१, हिमायतनगर १२, देगलूर ३१.५०, बिलोली सात, धर्माबाद ११.३३, नायगाव २.६०, मुखेड २८.५७. जिल्ह्यात एकूण २२३.८४ मिलिमीटर, तर सरासरी १३.९९ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ९०.७१ मिलिमीटरनुसार ५.३८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.

मंडळनिहाय झालेला पाऊस
(पाऊस मिलिमीटरमध्ये)
नांदेड शहर २६, तुप्पा ५१, विष्णुपुरी २१, वसरणी ४५, वजिराबाद २०, नांदेड ग्रामीण १५, तरोडा १२, लिंबगाव २३, सिंधी १८, मुगट ३१, बारड १२, इस्लापूर ११, दहेली ४०, जलधारा १४, दाभड १२, मालेगाव १५, धर्माबाद २९, मुक्रमाबाद ८५, बाऱ्हाळी ३९, चांडोळा २६, मुखेड १८, जांब, येवती प्रत्येकी दहा, तळणी ३०, मनाठा १६, निवघा १४, जवळगाव १५, सरसम ११, हिमायतनगर १०, आदमपूर १४, देगलूर ४१, खानापूर ३२, शाहापूर ४१, मरखेल २४, हाणेगाव २५ माळेगाव (म.) २६, बारुळ ११, कुरुळा ११, किनी १९, भोकर १३, माहूर २९, वाइ १७ सिंदखेड १८, लोहा २५, माळाकोळी २३, शेवडी १०, सोनखेड १४, नरसी ११.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com