शेतकरी कुटूंबांसाठी दिलासा.....कसा तो वाचा

कृष्णा जोमेगावकर
गुरुवार, 11 जून 2020

मागील वर्षी १२२ घटना घडल्या होत्या. यंदा मात्र आत्महत्येच्या घटनेत घट झाली. ता. ११ जूनपर्यंत जिल्ह्यात ३४ घटना घडल्या आहेत. यात जानेवारीमध्ये सात, फेब्रुवारीत ९, मार्चमध्ये पाच, एप्रीलमध्ये ९ तर मे महिन्यात तीन आत्महत्या घडल्या आहेत.

नांदेड : सततच्या दुष्काळाने अडचणीत आलेले शेतकरी आत्महत्यांचा मार्ग अवलंबत आहेत. मागील सहा वर्षात ८६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मागील वर्षी २०१९ मध्ये १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. यंदा मात्र यात घट होवून ता. एक जानेवारी ते ता. ११ जून या कालावधीत ३४ घटना घडल्या आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येचा मार्ग अवलंबू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी केले आहे. 

हेही वाचा....शिल्लक कापसाची नोंद करा....कोणी केले आवाहन ते वाचा

सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या
जिल्ह्यात मागील सतरा वर्षांपासून शेतकरी आत्महत्या होत आहेत. यात वाढ २०१४ पासून वाढ झाली. सततचा दुष्काळ, कर्जाचा वाढणारा डोंगर यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. जिल्ह्यात मागे सतत चार वर्षे शेतकऱ्यांना दुष्काळाशी सामना करावा लागला होता. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी अतिवृष्टी. यातूनही चुकून समाधानकारक पाऊसपाणी झालेच तर अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे हातातोंडाशी आलेली पिके वाया जातात. तर काही दिवसांच्या पावसातच महिनाभराची सरासरी गाठली जाते. यामुळे निर्सगावर अवलंबून असलेला हंगाम हातून जातो. यामुळे पिकांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड होत नाही. परिणामी शेतकरी आत्महत्येचा मार्ग अवलंबतो.

हेही वाचलेच पाहिजे....अकरा लाख क्विंटल कापसाची खरेदी.....कुठे ते वाचा

यंदा साडेपाच महिन्यात ३४ घटना
मागील वर्षी १२२ घटना घडल्या होत्या. यंदा मात्र आत्महत्येच्या घटनेत घट झाली. ता. ११ जूनपर्यंत जिल्ह्यात ३४ घटना घडल्या आहेत. यात जानेवारीमध्ये सात, फेब्रुवारीत ९, मार्चमध्ये पाच, एप्रीलमध्ये ९ तर मे महिन्यात तीन आत्महत्या घडल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय शेतकरी आत्महत्या निवारण समितीत यातील २६ शेतकरी कुटूंब मदतीसाठी पात्र ठरले आहेत. तर पाच अपात्र ठरले आहेत. २१ प्रकरणात मदत केली आहे. तसेच चौकशीसाठी तीन प्रकरणे प्रलंबीत असल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली.

सहा वर्षात ८६१ आत्महत्या
सहा वर्षांत ८६१ शेतकऱ्यांनी मृत्युला कवटाळले आहे. यात २०१४ मध्ये ११८, २०१५ मध्ये १९०, २०१६ मध्ये १८०, २०१७ मध्ये १५३, २०१८ मध्ये ९८, २०१९ मध्ये १२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. चालू वर्षातील १२२ घटना घडल्या. यातील ९९ शेतकरी कुंटूब मदतीसाठी पात्र ठरले आहेत. १२  शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. तसेच ११ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मिळाली. तर २०२० मधील पहिल्या महिन्यात सहा शेतकरी आत्महत्या घडल्या आहेत.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Comfort for the farming family ..... how to read it