esakal | 'अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांनी पीक विमा कंपनीस माहिती द्यावी'
sakal

बोलून बातमी शोधा

crop insurance

'अतिवृष्टीने नुकसान झालेल्यांनी पीक विमा कंपनीस माहिती द्यावी'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड: जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अनेक भागात अतिवृष्‍टी झाली आहे. त्‍यामुळे नदी नाल्‍यांना पूर येऊन शेती क्षेत्राचे नुकसान होण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. अशावेळी विमा संरक्षित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळणेसाठी झालेल्‍या नुकसानीची पुर्वसुचना संबंधीत विमा कंपनीस ७२ तासामध्‍ये कळवावी, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी केले आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेती क्षेत्राचे नुकसान झाल्‍यास विमा कंपनीकडे नुकसान भरपाई दावा दाखल करता येतो. विमा दावा मंजूर होण्यासाठी झालेल्‍या पीक नुकसानीची माहिती, पुर्वसुचना कंपनीस देणे गरजेचे आहे. त्‍यासाठी पीक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्‍ले स्‍टोअर वरुन Crop Insurance हे ऍप डाउनलोड करुन त्‍यामध्‍ये आपल्‍या नुकसानीची माहिती भरावी किंवा 18001035490 या टोल फ्री क्रमांकावर किंवा supportagri@iffcotokio.co.in या पत्‍यावर ई-मेलवर नुकसानीची पुर्वसुचना दयावी किंवा कृषी विभाग व महसूल विभागास याबाबत माहिती कळवावी, असेही आवाहन केले आहे.

loading image