
नांदेड : गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यात ३१ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. दरम्यान, शनिवारी (ता.१६) पहाटे कोटबाजार (ता.कंधार) येथे घराची भिंत कोसळून दांपत्य ठार झाले. तर, किनवट तालुक्यातील सिंदगी (चिखली) येथील स्कूल व्हॅनसह नाल्याच्या पुरामध्ये चालक वाहून गेला. यात काही भागात पशुधनही दगावले. पैनगंगेलाही पूर आला. किनवट-उमरखेडसह अनेक रस्त्यांवरील संपर्क तुटला.