
मुखेड (जि. नांदेड) : मराठवाड्यात गेल्या चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने रविवारी (ता. १७) जोर धरला. नांदेड आणि बीड जिल्ह्यांच्या काही भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. लेंडी नदीला आलेल्या महापूराने मुखेड तालुक्यातील चार गावांना वेढा दिला. बचाव पथकांनी दिवसभरात सुमारे तीनशे ग्रामस्थांची पुरातून सुटका केली.