विधायक बातमी : असाही वाहतोय माणुसकीचा झरा; मुलाच्या लग्नात ५०१ वऱ्हाडींना हेल्मेट          

धोंडीबा बोरगावे
Monday, 11 January 2021

याच विवाह सोहळ्यात प्रत्येकाचा जीव हा सारखाच असतो आणि तो गमावण्याची वेळ ज्याच्यावर येते त्याचे आणि त्याच्या परिवाराचे कसे हाल होतात याचा सारासार विचार करुन वर पित्याकडून उपस्थित वऱ्हाडी पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून हेलमेटचे वाटप करण्यात आले.

फुलवळ ( ता. कंधार, जिल्हा नांदेड ) : आजही माणुसकी आणि माणूसपण जिवंत असल्याचे ज्वलंत उदाहरण एका विवाह सोहळ्यात पाहायला मिळाले. ते म्हणजे सर्वत्र दररोज होत असलेले अपघात पाहता अनेकांनी हेल्मेट घातलेले नव्हते म्हणून जीव गमवावा लागला अशा बातम्या आपण रोज वाचतो. याचाच विचार करुन रविवारी (ता. १०) जानेवारी रोजी क्रांतीभुवन बहाद्दरपुरा येथे पेठकर परिवाराचा विवाह सोहळा पार पडला. त्यात वर पित्याने लग्नाला आलेल्या ५०१ वऱ्हाडी पाहुणे मंडळीला हेल्मेटचे वाटप केले. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनाठायी खर्च करण्यापेक्षा असा आदर्श घेऊन इतरांनीही वेगवेगळे उपक्रम राबविले जावेत अशीच चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.

शिवकांता भगवान माणिराव पाटील पेटकर यांचे चिरंजीव तथा पांचाली इन्शुरन्स क्लब व पांचाली टेंट डेकोरेशनचे मालक बसवेश्वर यांचा शुभ विवाह प्रतिभा पशुपती आश्रोबा मिटकरी रा. माजलगाव यांची कन्या प्रियंका हिच्याशी जुळला. तो रविवारी (ता. १०) जानेवारी रोजी रितीरिवाज प्रमाणे बहाद्दरपुरा ता. कंधार येथील सद्गुरु आश्रम शाळेत दुपारी १२: ३० वाजता संपन्न झाला. 

हेही वाचा - खळबळजनक  ! महाराष्ट्रात पोहोचला Bird Flu, मुरूंबा गावातील 800 कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच

याच विवाह सोहळ्यात प्रत्येकाचा जीव हा सारखाच असतो आणि तो गमावण्याची वेळ ज्याच्यावर येते त्याचे आणि त्याच्या परिवाराचे कसे हाल होतात याचा सारासार विचार करुन वर पित्याकडून उपस्थित वऱ्हाडी पाहुण्यांना भेटवस्तू म्हणून हेलमेटचे वाटप करण्यात आले.

यावेळी वराचे काका भुजंगराव, बाबूराव माणिकराव पेटकर, भगवान माणिकराव पेटकर, मनोहर माणिकराव पेटकर, परमेश्वर माणिकराव पेटकर,
संजय माणिकराव पेटकर यांच्यासह पाहुणे मंडळी, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hello to 501 brides at child marriage nanded news