कोरोनात जीव गमावणाऱ्याच्या कुटुंबियांना मदत मिळावी 

कृष्णा जोमेगावकर
शनिवार, 30 मे 2020

मागील दोन ते अडीच महिन्यापासून देशात टाळेबंदी लागू आहे. रोजगार बंद आहे आणि या गंभीर आजाराचे प्रादुर्भाव अद्यापही पसरत असून नागरिकांच्या जीवावर मोठे संकट कायम आहे. ज्या घरातील सदस्यास कोरोनामुळे प्राण गमवावे लागले त्या कुटुंबियांना खुप काही सोसावे लागले आणि सोसावे लागत आहे.

नांदेड : जागतिक महामारी कोरोना कोविड - १९ संक्रमनामुळे देशात हजारोच्या संख्येत नागरिक प्राण गमावत असून मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना पाच लक्ष रुपयांची आर्थिक मदत केंद्र शासनातर्फे देण्यात यावी तसेच या अजारातून बरे झालेल्या रुग्णांना एक लाख रूपये मदत मिळावी अशी मागणी रविंद्रसिंघ मोदी यांनी केंद्र शासनाकडे केली आहे.

केंद तसेच राज्य सरकारला साकडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ट्ववीट पाठवून शनिवारी (ता. ३०) मागणी करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, आरोग्य मंत्री डॉ. राजेश टोपे आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेही मागणी केली आहे. 

हेही वाचा.....Video - हळद लागवडीसाठी शेतकरी जमिनीच्या पूर्वमशागतीत व्यस्त

जनतेपर्यंत प्रबोधन करण्यात आले नाही
देशात ता. ३० जानेवारी पासूनच कोरोना कोविड - १९ चे संक्रमण सुरु झाले आहे. ता. २० मार्च रोजी केंद्र शासनाने कोरोनाचे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुरु केली. ता. २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लावला होता. त्यानंतर लगेच ता. २५ मार्च पासून पहिला लॉकडाउन सुरु झाला. भारतात कोरोना संकक्रमाना विषयी १३० कोटी जनतेपर्यंत याबाबत प्रबोधन करण्यात आले नाही.

हेही वाचलेच पाहिजे.....नृसिंह जिनिंग फॅक्टरीला भीषण आग

सुरक्षा साधनांची कमतरता
गरीब जनतेकडे सुरक्षा बाळगण्याकरीता सॅनिटायझर किंवा इतर सुविधांची व्यवस्था शासनातर्फे पोहचलीच नाही. सर्वकाही फक्त जाहिरातीपर्यंतच मर्यादित होते. त्यामुळे सामान्य व गरिबांच्या घरापर्यंत कोरोनाचे प्रादुर्भाव पोहचले. देशात आजपर्यंत कोरोनाची लागण होऊन जवळपास पाच हजार नागरिकांनी प्राण गमवावे लागले आहे. तसेच एक लाख ६० हजारापेक्षा जास्त नागरिकांना संक्रमण सकारात्मक (पॉजिटिव ) आला आहे. 

लॉकडाउन आणि कर्ता व्यक्ती गेल्याने कुटूंबावर संकट
मागील दोन ते अडीच महिन्यापासून देशात टाळेबंदी लागू आहे. रोजगार बंद आहे आणि या गंभीर आजाराचे प्रादुर्भाव अद्यापही पसरत असून नागरिकांच्या जीवावर मोठे संकट कायम आहे. ज्या घरातील सदस्यास कोरोनामुळे प्राण गमवावे लागले त्या कुटुंबियांना खुप काही सोसावे लागले आणि सोसावे लागत आहे. म्हणून प्राण गमावणाऱ्या व्यक्तीच्या कुटुंबियांना पाच लाखांची आर्थिक मदत केली पाहिजे. तसेच या संक्रमनात पॉजिटिव ठरलेल्या पण संक्रमणावर मात केलेल्या रुग्णांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देवून त्यांना नव्याने जीवनास सुरु करण्यासाठी सहकार्य करावे. 

आर्थीक पॅकेजमधून मदत द्यावी
भारतातील दानशुर व्यक्तींनी, उद्योगपति, व्यापारी, समाजसेवक आणि इतर लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर कोरोनाशी लढा उभारण्यासाठी आर्थिक मदत केंद्राकडे दिली आहे. तसेच राज्यात देखील शासनाला आर्थिक मदत मिळत आहे. केंद्राने २० लाख कोटींचे पॅकेज जाहीर केलेला आहे. पण त्यात प्राण गमावणाऱ्या आणि संक्रमित पीडितास आर्थिक मदत देण्याविषयी कोणतीच तरतूद दिसून येत नाही. तेव्हा केंद्र शासनाने पंचवार्षिक योजनेचा एक वर्ष पूर्ण होत आहे. वेळी निर्णय घ्यावा असेही रविंद्रसिंघ मोदी यांचे म्हणणे आहे. सोबतच महाराष्ट्र शासनानेही याचा धर्तीवर आर्थिक मदत देण्याविषयी धोरण तयार करावे, अशी ही मागणी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Help the families of those who lost their lives in Corona