केन्द्रीय सशस्त्र बल सेवानिवृत्त संघटनेकडून पोलिसांना मदतीचा हात

प्रल्हाद कांबळे
Saturday, 26 September 2020

भाग्यनगर, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात  कर्मचाऱ्यांना मास्क सैनिटाइजर वाटप

नांदेड : कोव्हिड- १९ कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आपले कर्तव्य निष्ठेने  निभावत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन वर्दीची प्राणपणाने निष्ठा असणारे केंद्रीय सशस्त्र अर्ध सुरक्षा दलातील सेवा निवृत कर्मचारी जिल्हा शाखा नांदेड संघटनेच्या वतीने ता..२५ रोजी शुक्रवारी भाग्यनगर व नांदेड़ ग्रामीण पोलीस ठाणे येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क आणी सैनिटाइजर वाटप करण्यात आले 

भाग्यनगर पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक  श्री सोनवणे, शेख, जाधव  व कर्मचारी उपस्थित होते त्याबरोबर नांदेड़ ग्रामीण पोलीस ठाणे येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश थोरात व सर्व कर्मचारी यांच्याकडे जावून त्यांची भेट घेतली. संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल लोंणे, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल सोनाले, जिल्हा सचिव गणेश पवार, जिल्हा सहसचिव राजाराम पांडागळे, विलास पाटील इंगले, राजाराम हाळदे, शशिकांत मोडवान, मारोती गुंठे  व जिल्हयातुन सर्वच आजी माजी सैनिक उपस्थित होते.

हेही वाचा  शौर्यदिनानिमित्त माजी सैनिकांचा सत्कार -

पोलिस बांधव महामारी काळात अविरत सेवा देत आहे.

प्रथम सशस्त्र अर्धसैनिक बलातील जिल्ह्य़ातील सेवानिवृत्त सैनिकांच्या बैठकीत सेवानिवृत्त सैनिक व त्यांच्या कांही अडीअडचणी प्रश्नवर चर्चा झाली. व संघटनेचे जिल्हा पदाधिकारी जाहीर करण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी म्हणाले की आपले संघटन अधिक मजबूत करून आपले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल याअंतर्गत आज आमचे पोलिस बांधव महामारी काळात अविरत सेवा देत आहे. त्यांना मास्क व सॅटायझर वाटप केले. सैनिक संघटनेच्या कार्याचे भाग्यनगर पोलिस ठाणे येथील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ जाधव व ग्रामीण पोलीस ठाणे येथील श्री. थोरात यांनी अभिनंदन करून आभार मानले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A helping hand to the police from the Central Armed Forces Retired Association nanded news