नांदेडमध्ये हायटेक शेती : चिंतलवार हे शेतकरी घेत आहेत जिरेनियमचे सुंगधी वनस्पती पीक

file photo
file photo

नांदेड : राज्यातील शेतकरी पारंपारिक शेतीपेक्षा वेगळा मार्ग स्विकारातना दिसत आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील शहापूर येथील विठ्ठल चिंतलवार या शेतकऱ्याने सुगंधी वनस्पती शेतीचा पर्याय स्विकारला आहे. सुगंधी वनस्पती म्हणजेच जिरेनियम (Geranium Farming)शेतीचा पहिलाच प्रयोग त्यांनी यशस्वी करुन दाखवला आहे. जिरेनियम वनस्पतीच्या पानांपासून तेल काढून ते विविध कंपन्यांना विकून विठ्ठल चिंतलवार यांनी संसारात आणि शेतीमध्ये प्रगती साधली आहे. 

विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेतीचा एक व्हिडीओ युट्युबवर पाहिला. त्यानंतर अहमदनगरमध्ये जिरेनियम शेतीचा प्लँट पाहिला. पहिल्यांदा जिरेनियमचा प्लँट आवडल्याने दुसऱ्यांदा माहिती घेतली आणि जिरेनियमची लागवड करण्याचा निर्णय घेतला. जिरेनियमची लागवड करण्यासाठी विठ्ठल चिंतलवार यांना लागवड, ड्रीप आणि खते यासाठी एकरी एक लाख रुपये खर्च आला. या पिकावर फवारणी करण्याचा खर्च येत नाही. प्राणी देखील या वनस्पतीचे नुकसान करत नसल्याचे विठ्ठल चिंतलवार यांनी सांगितले.

उत्पन्न कसे मिळते

विठ्ठल चिंतलवार यांना त्यांच्या शेतीतून जिरेनियम वनस्पतींच्या पानांपासून ३० ते ३५ किलो तेल मिळते. जिरेनियमच्या तेलाला एका किलोला १२ ते १४ हजार रुपये भाव मिळतो. विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेतीत पुढचे पाऊल टाकत स्वत: चा डिस्टिलेशन प्लँट उभा केला. त्यासाठी त्यांना सुरुवातीला अडीच लाख रुपये खर्च आला. त्यानंतर त्यांनी एक लाखाचा टँक खरेदी केला आहे. एकूण लागवड आणि ऑईल युनिटचा खर्च साडेचार लाख रुपयांपर्यंत आला. विठ्ठल चिंतलवार यांना जिरेनियम शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते आहे. विठ्ठल चिंतलवार यांच्या शेतातील जिरेनियम शेती आणि डिस्टीलेशन प्रकल्प पाहण्यासाठी परिसारातील शेतकरी भेटी देत आहेत.

मुंबईच्या कंपन्यांशी करार

देगलूर तालुक्यातील विठ्ठल चिंतलवार यांनी जिरेनियम शेती केली आहे. या वनस्पतीच्या पानांपासून तेलाची निर्मिती करतात. मुंबई येथील कंपन्यांनी विठ्ठल चिंतलवार यांच्याशी करार केला आहे. थेट मुंबईच्या कंपन्यांशी लेखी करार केल्यामुळे उत्पन्नाचा हमखास मार्ग चिंतलवार यांना उपलब्ध झाला आहे. विठ्ठल चिंतलवार यांनी त्यांच्या शेतात डिस्टिलेशन प्लँट उभारला असून जवळपासच्या शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या जिरेनियमच्या पानांपासून तेल काढून देखील देण्याचं काम ते करतात.

जिरेनियम शेतीतून कृषी अधिकाऱ्यांना आशा

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी आता नवनवीन पिकांची लागवड करत आहेत. सोयाबीन, मूग, उडीद आणि इतर पीक घेतल्यानं उत्पादनात घट होत आहे. नांदेडच्या देगलूर तालुक्यातील शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिरेनियम पिकाची लागवड सुरु केली आहे. प्रक्रिया केंद्र उभे करुन जिरेनियम या वनस्पतीच्या पानांपासून तेल काढले जाते. जिरेनियमच्या तेलाला १२ ते १४ हजारांपर्यंत भाव मिळतो. एकरी १० ते १५ किलो तेलाचे उत्पादन करता येते. साधारणता शेतकऱ्यांना दीड ते दोन लाखांपर्यंत उत्पन्न मिळते, असे कृषी अधिकारी रमेश चलवदे यांनी सांगितले.

तेलाचं काय होत?

जिरेनियमच्या तेलाचा वापर सुगंधी साबण, अगरबत्ती, अत्तर, परफ्युम तयार करण्यासाठी केला जातो. शेतकऱ्यांनी गटानं एकत्रित येऊन उत्पादन घेतले तर शेतकऱ्यांना फायदा होतो. कृषी विज्ञान केंद्र सगरोळी येथील शास्त्रज्ञांनी पुढाकार घेतला आहे. शेतकऱ्यांनी कंपन्यांशी लेखी करार केला पाहिजे. कृषी विज्ञान केंद्राकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. हा प्रकल्प जर यशस्वी झाला तर तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर राबवता येईल. सुगंधी वस्तूंची मागणी पाहता जिरेनियम शेतीतून शेतकऱ्यांना उत्पन्नाचा चांगला मार्ग उपलब्ध होऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com