esakal | दाग अच्छे है! जखमीसाठी देवदूत बनले पोलिस; गृहमंत्र्यांनी घेतली दखल
sakal

बोलून बातमी शोधा

Home Minister Anil Deshmukh has taken notice of the work of Wasmatphata Highway Police.jpg

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे व महामार्ग पोलिस कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या ट्टिटरवर फोटो शेअर करुन पोलिसांच्या कार्याची दखल घेतली आहे.

दाग अच्छे है! जखमीसाठी देवदूत बनले पोलिस; गृहमंत्र्यांनी घेतली दखल

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर (नांदेड ) : नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या ट्रक-दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता. या दुचाकीस्वारास वसमतफाटा महामार्ग पोलिस पथकाचे पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे यांनी स्वतः तत्काळ जखमीला उपचारासाठी हालवून मदत केली होती. यात जखमीचे रक्त पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे यांच्या गणवेशाला लागले. ते जखमीसाठी देवदुतासारखे धावून गेल्याने जखमीचा जीव वाचला. या घटनेची माहिती प्रसार माध्यमातून व सामाजिक माध्यमातून प्रसारित झाली होती.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे व महामार्ग पोलिस कर्मचारी यांच्या कार्याची दखल घेऊन आपल्या ट्टिटरवर फोटो शेअर करुन पोलिसांच्या कार्याची दखल घेतली आहे.

नांदेड अर्धापूर-नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वसमतफाटा येथे महामार्ग पोलिस सुरक्षा पथक आहे. या पथकाव्दारे जखमींना मदन करणे, उपचारासाठी रूग्णालयात दाखल करणे, वाहतूक सुरळीत करणे, वाहतुकीला शिस्त लावणे, अपघात प्रवन भागात सूचना फलक लावणे आदी कामे केली जातात. तसेच अपघातग्रस्तांना तत्काळ मदत करणे हे प्राथमिक व महत्त्वाची जबाबदारी या पथकावर आहे.

पोलिस, सैन्यात वर्दीला विशेष असे महत्व आहे. वर्दीचा सन्मान केला जातो. तसेच अधिकारी व कर्मचारी वर्दीचे पावित्र्य राखत असतात. अर्धापूर नांदेड रस्त्यावर नांदेडकडून नागपूरकडे जाणा-या ट्रकने वसमतफाटा चौकशी जवळ (आर जे 11जी बी 2127)  दुचाकीस्वारास (एम एच 26 बी एस 4175 ) जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार माधव नरसिंहराव चिकारकर (वय 42) जखमी झाला. त्यांना उपचारासाठी तातडीने हलविणे आवश्यक होते. अशा आणीबाणीच्यावेळी इतर अधिकारी व कर्मचा-यांची वाट न पाहता पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे अपघात स्थळी धावून गेले व जखमीला स्वतः उचलून रूग्णवाहिकेत ठेवले व रूग्णवाहिकेला तातडीने रवाना केले. जखमीला उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले.

या घटनेची छायाचित्रे प्रसारमाध्यामातून प्रसारित झाले. या घटनेची दखल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली. आपल्या ट्टिटरवर पोलिस अधिका-यांचे छायाचित्रे शेअर करून महामार्ग पोलिसांच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दखल घेऊन कौतुक केल्याने महामार्ग पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

loading image