esakal | होमिओपॅथिक औषधीने प्रतिकारशक्ती वाढविणे शक्य : डॉ. विजय शर्मा
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Photo

सुदृढ समाजाची बांधणी करणे हे ‘होमिओपॅथीचे’ जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांचे स्वप्न आणि जीवन कार्य होते. त्यांनी बघितलेले स्वप्न आज खऱ्या अर्थाने सत्यात उतरताना दिसून येते. कोरोनाला रोखण्यासाठी आपल्याकडे प्रचंड इच्छाशक्ती व रोगप्रतिकारक औषधींची मदत हे कोरोनाला हरवण्यासाठी सर्वात मोठे हत्यार आहे. 

होमिओपॅथिक औषधीने प्रतिकारशक्ती वाढविणे शक्य : डॉ. विजय शर्मा

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : भारत अरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आयुष या संस्थेने कोरोना प्रतिबंधक औषधींच्या यादीत ‘आर्सेनिक’ अल्बम - ३० या होमिओपॅथी औषधींचा समावेश केला आहे. कोरोनाला हरवण्यासाठी होमिओपॅथी औषध गुणकारी ठरत असल्याने केरळ राज्याने अर्सेनिक अल्बम - ३० औषधी घेण्यासाठी आघाडी घेतली आहे. त्याच धर्तीवर युवक कॉंग्रेसचे विठ्ठल पावडे यांच्या मदतीने शहरातील एक हजार नागरीकांना अर्सेनिक अल्बम - ३० हा तीन दिवसांच्या गोळ्यांचा डोस मोफत देण्याचा संकल्प केल्याचे होमिओपॅथीक तज्ज्ञ डॉ. विजय शर्मा यांनी दिली.  

कोणी मुळापासून तुटलेला...कोणी जगण्यालाच विटलेला... लांब कुठे तरी स्मशानात चितेचे फडफड...कुठे पार्थिंवाची पेटन्याची धडपड.. तर कुठे कोरोना बांधीतांची प्रेतच नाकाराणारे अप्तेष्ट सगळेच कसे विपरीत घडत आहे. तीन अक्षरी ‘कोरोना’ नावाच्या राक्षसाने जणू संंबंध मानव जातीचे जगणे अवघड केले आहे. कोरोनाच्या या लढाईत भारत देश एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे. कोरोना सारख्या खतरनाक आजारावर औषध उपलब्ध नसले तरी, मनोबल आणि सकारात्मकता या दोन गोष्टींवर रोगप्रतिकारक शक्ती हेच आपलं शस्त्र आणि अस्त्र आहे.  

हेही वाचा- रस्त्यांवरील फुले देताहेत सकारात्मक जगण्याचे बळ, कसे? ते वाचाच

ज्या व्यक्तींमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रचंड इच्छाशक्ती आहे, अशा व्यक्तीस कोरोना नावाचा राक्षस घाबरतो. त्याला दूर सावरण्यासाठी होमिओपॅथिकची मदत घेण्याची हीच खरी वेळ आहे. नैसर्गिक स्रोतांच्या पायावर निश्चित असलेली ही उपचार पद्धती वरवरची नाही; तर ती रोगाला मुळापासून नष्ट करते. कोरोना विरुद्धच्या लढाईत आर्सेनिक अल्बम -३० हे औषध अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडू शकते. हे औषध नैसर्गिक स्त्रोतापासून तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे आपल्या शरीरात असलेल्या उपजत प्रतिकार यंत्रणा जागृत ठेवते आणि आपल्या अंगभूत वैशिष्ट्यांनी प्रतिकारक कवच निर्माण करते.  

अर्सनिक अल्बम - ३० औषध नेमकी कुणी घ्यावी असा एक प्रश्न मनात असतो. परंतु ही औषध कुठल्याही वयाच्या व्यक्तीस लाभदायक ठरते. याचा दुष्परिणाम नाही. अगदी दोन वर्षे वयाच्या मुलालाही या औषधीच्या दोन गोळ्या देता येऊ शकतील. मोठ्या व्यक्तीने महिन्यातून तीन वेळेस पाच गोळ्या घेणे आवश्यक आहे. गोळ्या घेताना या गोळ्यांना शक्यतो हाताचा स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी. कच्चा कांदा, लसून खाणे टाळावे याशिवाय कॉफी पिणे टाळल्यास अर्सेनिक अल्बम - ३० च्या गोळ्यांचा अधिक चांगला परिणाम दिसून येतो.  
-डॉ. विजय शर्मा (होमिओपॅथिक तज्ज्ञ)  
 

loading image
go to top