esakal | कंधारमधील `या` गावातील घरफोडीत पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

कंधार तालुक्यातील शेकापूर येथे पावणेदोन लाखाची घरफोडी तर माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील ग्रामसेवकाला थापडबुक्क्यांनी मारहाण. 

कंधारमधील `या` गावातील घरफोडीत पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : कंधार तालुक्यातील शेकापूर येथे झालेल्या घरफोडीत नगदी व सोन्या- चांदीचे दागिणे असा पावणेदोन लाखाचा ऐवज लंपास केला. ही घरफोडी सोमवारी (ता. ११) पहाटेच्या सुमारास झाली. या प्रकरणी कंधार पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कंधार तालुक्यातील शेकापूर येथे राहणारे सुनिल बालाजी डफडे (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह रविवारी (ता. १०) रात्री उकाडा होत असल्याने ते छतावर झोपले होते. सोमवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कपाटातील नगदी व सोन्या- चांदीचे दागिणे असा एक लाख ७५ हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. 

कंधार पोलिसांनी अज्ञताविरुद्ध गुन्हा दाखल केला

ही बाब सकाळी झोपेतून उठल्यानंतर सुनील डफडे यांच्या लक्षात आली. त्यांनी घरात जावून पाहिले तर चोरट्यांनी घर साफ केले होते. श्री. डफडे यांनी कंधार पोलिस ठाण्यात येऊन माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शेकापूर गाठले. घरफोडी झालेल्या घरी जावून पंचनामा केला. सुनिल डफडे यांच्या फिर्यादीवरुन कंधार पोलिसांनी अज्ञताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास महिला फौजदार श्रीमती पवार करत आहेत. 

हेही वाचा - नांदेडातील बालगृहांना जीवनावश्‍यक साहित्याचे वाटप

ग्रामसेवकास थापडबुक्क्यांनी मारहाण

नांदेड : रोजगार हमी योजनेचे काम आम्हाला का देत नाहीस असे म्हणून ग्रामसेवकास थापडबुक्‍क्यांनी मारहाण करून शासाकिय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार वाई बाजार (ता. माहूर) येथील ग्रामपंचायत कार्यालायत सोमवारी (ता. ११) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. 

माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे राहणारे उदय जोगा जाधव, रवी उदय जाधव, गणेश उदय जाधव, अंबादास मल्लेशु राजूरकर, विनोद जोशी राठोड, बाळू नुरसिंग चव्हाण, गोविंद दुधराम राठोड, संजय सवाईराम चव्हाण यांनी संनमत करून ग्रामपंचायत कार्यालय गाठले. यावेळी कार्यालयात ग्रामसेवक शंकर राजन्ना गुंडमवार हे शासकिय काम करत होते. कार्यालयात परवानगीशिवाय आत घुसून आम्हाला रोजगार हमीचे कामे का देत नाहीस असे म्हणून त्यांना सुरवातीला शिविगाळ केली.

शासकिय कामात अडथळा

त्यानंतर टेबलवरील करवसुली पावती बुक व जनरल कॅश बुक फाडून शंकर गुंडमवार यांना थापडबुक्क्यांनी मारहाण केली. शासकिय कामात अडथळा निर्माण करून कार्यालयात दहशत पसरविली. एवढेच नाही तर शासकिय आदेशाचे उल्लंघन करुन कोवीड- १९ उपाय योजना प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केले. या प्रकरणी शंकर राजन्ना गुंडमवार यांच्या फिर्यादीवरुन सिंदखेड पोलिस ठाण्यात वरील आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक फौजदार पठाण करत आहेत. 

loading image